शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आजी-नातवावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:59 IST

आजारी नातवाला भेटण्यासाठी हळगाव येथील महिला कुटुंबीयांसह जामखेड येथे जात असताना करमाळा रस्त्यावरील सरदवाडी फाट्यानजीक गुरुवारी दुपारी वाहनाला भीषण अपघात झाला.

जामखेड (जि. अहमदनगर) : आजारी नातवाला भेटण्यासाठी हळगाव येथील महिला कुटुंबीयांसह जामखेड येथे जात असताना करमाळा रस्त्यावरील सरदवाडी फाट्यानजीक गुरुवारी दुपारी वाहनाला भीषण अपघात झाला. यामध्ये आजी मीराबाई रामभाऊ मोरे या जागीच ठार झाल्या. तसेच कारमधील पाच जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर तीन तासांनी आजारी नातवाचाही मृत्यू झाला.संजय रामभाऊ मोरे हे पुणे येथे नोकरीला असून दीपावली सणानिमित्त परिवारासह गावी हळगावला आले होते. त्यांचा मुलगा शिवम (७) आजारी असल्याने त्याला जामखेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी शिवमची प्रकृती बिघडल्याने वडील रामभाऊ मोरे व मीराबाई अन्य दोन नातवांना व नातेवाइकांना सोबत घेत जामखेडला खासगी वाहनाने निघाले होते. करमाळा जामखेड रस्त्यावरील सरदवाडी फाट्याच्या पुढे असलेल्या चढणीवर अचानक गुरांचा कळप गाडीला आडवा आला. जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात गाडी उलटून सात फूट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात मीराबाई (५५) या जागीच मृत झाल्या. रामभाऊ (६०) नातेवाईक आप्पासाहेब शिंदे (३५) हे दोघे गंभीर जखमी झाले. तसेच काही वेळातच शिवम याचाही मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यू