शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

आजोबांचे रेकॉर्ड ब्रेक : डॉ.सुजय विखे जिल्ह्यातील तरुण खासदार,३७ व्या वर्षी संसदेत

By नवनाथ कराडे | Updated: May 26, 2019 13:51 IST

डॉ. सुजय विखे ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झाले. निवडणुकीचा प्रवास सुरू असताना काही विक्रम त्यांच्या नावावर जमा झाले आहेत.

नवनाथ खराडेअहमदनगर : डॉ. सुजय विखे ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झाले. निवडणुकीचा प्रवास सुरू असताना काही विक्रम त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. जिल्ह््यातील सर्वात तरुण खासदार होण्याचा मान डॉ. सुजय यांनी मिळवत आजोबा बाळासाहेब विखे यांचे रेकॉर्ड ब्रेक केले. अहमदनगर जिल्ह््याला लाभलेले सर्वात तरुण खासदार म्हणून नवीन रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाले.डॉ.सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे कोपरगाव(सध्याचा शिर्डी) मतदारसंघातून पाच तर अहमदनगर मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले. वडील राधाकृष्ण विखे कधीच लोकसभेच्या मैदानात उतरले नाहीत. सुजय यांना संसदेत पाठविण्याचे स्वप्न बाळासाहेब यांनी पाहिले. मात्र दहा वर्षापूर्वी शिर्डी मतदारसंघ राखीव झाला. यामुळे बाळासाहेब यांचे स्वप्न सत्यात उतरण्यास उशिर झाला.आता अहमदनगर मतदारसंघातून सुजय अवघ्या ३७ व्या वर्षी खासदार झाले. नगर जिल्ह््यात कमी वयातील खासदारकीचे रेकॉर्ड आजोबा बाळासाहेब विखे यांच्या नावावर होते. आजोबा वयाच्या ३९ व्या वर्षी १९७१ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसकडून कोपरगाव मतदारसंघातून खासदार झाले. त्यानंतर १९७७, १९८०, १९८४, १९८९ कोपरगाव मतदारसंघातून ते काँग्रेसकडून खासदार झाले. मतदारसंघ बदलून अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून १९९१ मध्ये त्यांनी नशीब आजमावले. न्यायालयातून त्यांनी ही निवडणूक जिकंली. त्यानंतर १९९८ मध्ये शिवसेनेकडून खासदार झाले. यानंतर पुन्हा ते कोपरगाव मतदारसंघात गेले व १९९९ मध्ये शिवसेनेकडून खासदार झाले.अहमदनगर(पूर्वीचा दक्षिण) मतदारसंघातून १९५१ मध्ये उत्तमचंद बोगावत, १९५७ मध्ये रघुनाथ खाडीलकर, १९६२ मोतीलाल फिरोदिया तर १९६७ मध्ये अनंतराव पाटील पहिल्यांदा खासदार झाले. या सर्वांचे त्यावेळी वय ३९ वर्षाहून अधिक होते. १९७१ मध्ये अण्णासाहेब शिंदे वयाच्या ४९ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. १९८० मध्ये चंद्रभान आठरे वयाच्या ६० व्या वर्षी खासदार झाले. यशवंतराव गडाख १९८४ मध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. १९९६ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी दादापाटील शेळके, १९९९ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी दिलीप गांधी तर २००४ मध्ये तुकाराम गडाख वयाच्या ५१ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. आणि आता २०१९ मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी डॉ.सुजय विखे पहिल्यांदा खासदार झाले. यापूर्वी सर्व खासदारांचे रेकॉर्ड तर सुजय यांनी मोडले असून आजोबा बाळासाहेब विखे यांचेही रेकॉर्ड ब्रेक केले.बहुतांश खासदार पन्नाशीनंतरच...!कोपरगाव मतदारसंघातून १९५१ मध्ये पंढरीनाथ कानवडे पहिल्यांदा खासदार झाले. १९६२ मध्ये अण्णासाहेब शिंदे ४० व्या वर्षी, १९७१ मध्ये ३९ व्या वर्षी बाळासाहेब विखे, १९९१ मध्ये शंकरराव काळे ७० व्या वर्षी, १९९६ मध्ये भिमराव बडदे वयाच्या ४९ व्या वर्षी, १९९८ मध्ये प्रसाद तनपुरे वयाच्या ५६ व्या वर्षी खासदार झाले. शिर्डी मतदारसंघातून २००९ मध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी भाऊसाहेब वाकचौरे, २०१४ मध्ये वयाच्या ५२ व्या सदाशिव लोखंडे पहिल्यांदा खासदार झाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगरshirdi-pcशिर्डीSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील