शिर्डी : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे सपत्निक दर्शन घेतले. सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल यांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश ककाणे आदी उपस्थित होते.त्यानंतर साईबाबांचे त्यांनी सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा, योगिता शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
राज्यपाल सी. विद्यासागर साईदरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:19 IST