शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ पुन्हा उभा करण्यासाठी सरकार मदत करील- राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 17:29 IST

आगीसारख्या दुर्दैवी घटनेमुळे हा स्टुडिओ भस्मसात झाला असला तरी राज्य शासन निश्चितपणे त्यांच्या पाठिशी असून यासंदर्भात व्यापक दृष्टीकोन ठेवून आणि हा स्टुडिओ पुन्हा उभा राहावा, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील

अहमदनगर : शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ हा नगर शहर आणि जिल्ह्यासाठी वेगळा असा ठेवा होता. नगरकरांचा तो अभिमान होता. आगीसारख्या दुर्दैवी घटनेमुळे हा स्टुडिओ भस्मसात झाला असला तरी राज्य शासन निश्चितपणे त्यांच्या पाठिशी असून यासंदर्भात व्यापक दृष्टीकोन ठेवून आणि हा स्टुडिओ पुन्हा उभा राहावा, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जलसंधारण व राजशिष्टाचार, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी मंगळवारी दुपारी प्रमोद कांबळे आर्ट स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली. आगीत झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शिंदे म्हणाले, प्रचंड मेहनतीतून कांबळे यांनी तयार केलेली शिल्पे, मूर्ती, विविध चित्रे, विविध मान्यवरांच्या चित्रांचा संग्रह या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. स्टुडिओत असणारा अमूल्य ठेवा नष्ट झाल्याबद्दल खेद व्यक्त करीत तुम्ही पुन्हा उभारी घ्याल, असा आशावादही शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रमोद कांबळे यांनी स्टुडिओसंदर्भातील विविध बाबींची माहिती पालकमंत्री प्रा. शिंदे यांना दिली.तत्पूर्वी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. आगीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. नगर शहर व जिल्हावासीय या कठीण प्रसंगी आपल्यासोबत असल्याचा आणि राज्य शासन व्यापक दृष्टीकोन ठेवून याकामी तुमच्या पाठिशी असेल, असा विश्वास पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे