शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळवाडी शाळेत अवतरली ‘ग्रहमाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 11:58 IST

सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, शनी आणि मंगळाला घेऊन पूर्ण ग्रहमालाच शनिवारी (दि़ १३) गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अवतरली!

अहमदनगर : सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, शनी आणि मंगळाला घेऊन पूर्ण ग्रहमालाच शनिवारी (दि़ १३) गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अवतरली! शनीची उडती तबकडी, लालेलाल मंगळ, सूर्य आणि भलामोठा गुरु, पृथ्वी हे चक्क आपल्यासमोरच अवतरल्याचे पाहून मुलेही चकित झाली़ उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी हे करुन दाखवले आहे ‘एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब’ या अप्लिकेशनच्या माध्यमातूऩदफ्तरमुक्त शनिवार आणि आनंददायी शिक्षणाच्या संकल्पनेतून उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध नवनवीन प्रयोगाच्या सहायाने, तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम करीत आहेत़ याचा भाग म्हणून शनिवारी त्यांनी निरस वाटणारा भूगोल हा विषय तंत्रज्ञानाच्या वापरातून सोपा करुन विद्यार्थ्यांना शिकविला़ प्रत्यक्ष ग्रहमाला वर्गात आणून विद्यार्थ्यांना प्रत्येक ग्रह समजावून सांगितला़ मोबाईलवरील तंत्रज्ञानाचा अविष्कार पाहून मुलेही हरखून गेली़विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढली‘एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब’ या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खगोलीय सूर्यमाला प्रत्यक्ष वर्गात अवतरण्याची किमया शनिवारी गोपाळवाडी शाळेत घडली़ लालेलाल मंगळ ग्रह, कडी असलेला शनी, सर्वात मोठा गुरू आणि आपण ज्या ग्रहावर राहतो तो पृथ्वी व पृथ्वीचा त्याचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे सगळं पाहून विद्यार्थी चकित झाले.अशी अवतरते सूर्यमालासंपूर्ण ग्रहमाला पाहण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोरवरच्या ए७स्र’ङ्म१ी१- ाङ्म१ टी१ॅी उ४ुी हे अ‍ॅप आणि त्याची मार्कर इमेज असणारे टी१ॅी उ४ुी डाऊनलोड करून घ्यावे लागेल़ त्यानंतर त्या क्युबवर स्कॅन करुन अ‍ॅप उघडल्यास आपल्यासमोर सूर्यमाला अवतीर्ण झालेली पाहायला मिळेल़नवीन तंत्रज्ञानाने दृश्य स्वरुपात विद्यार्थ्यांना पाठ शिकविल्यास ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहते़-सर्जेराव राऊत, मुख्याध्यापक

तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकविल्यास विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा आनंद लुटता येतो़ विविध संकल्पना समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होते़ -नारायण मंगलारम, शिक्षक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद