शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसाठी गोड बातमी..यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के जादा पाऊस; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:58 IST

यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोगी शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली.

भाऊसाहेब येवले /  राहुरी : यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोगी शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली. भारतात पावसाची सरासरी अकराशे ते बाराशे मिलिमीटर आहे. महाराष्ट्रात पावसाची सरासरी ७०० ते ८०० मिलिमीटर आहे. अहमदनगर जिल्ह्यात पाचशे ते साडेपाचशे मिलिमीटर पावसाची सरासरी आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबार येथे अडकून पडला आहे. तो पुढे सरकल्यानंतर १ जूनला केरळला येत असतो. यंदा मात्र ५ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत, असे रवींद्र आंधळे यांनी सांगितले.राहुरी येथे सोमवारी ४१ अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच काळात ४२ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाट आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान सध्या ४५ अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तापमानात होणारी वाढ लक्षात घेता पिकांना पाण्याची गरजही वाढू लागली आहे. पिकांना संध्याकाळी पाणी द्यावे, असे त्यांनी सूचविले आहे.

 सध्या उष्णतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मी महिन्यात कपाशीची लागवड करू नये. २५ मे नंतर बीटी कॉटनची लागवड करण्याची शिफारस आहे. मात्र सध्याचे तापमान लक्षात घेता पावसाचा शिरकाव झाल्यानंतर कपाशीची लागवड करावी. जूनअखेर कपाशीची लागवड पूर्ण करावी. यंदा सरासरीपेक्षा चार ते पाच टक्के पाऊस अधिक पडण्याची शक्यता आहे. -रवींद्र आंधळे, सहयोगी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसRahuriराहुरी