शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीला वीजपुरवठ्याचे कारण देत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:19 IST

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात वारंवार होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्याला शेतकरी वैतागले असतानाच आता याचा फटका तालुक्यातील प्रशासकीय कारभाऱ्यांनाही बसला आहे.

शेवगाव : वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, शेवगावकर हैराण झालेले असताना, या गलथान कारभाराचा 'शॉक' प्रशासकीय अधिकाऱ्यांना बसला आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला ऑनलाईन हजर राहाता न आलेल्या अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली आहे.    शुक्रवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड १९ संदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ऑनलाईन आढावा बैठक बोलावली होती. बैठकीला प्रांताधिकारी देवदत्त केकाण, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे, पाथर्डीचे तहसीलदार शाम वाढकर हे उपस्थित होते. मात्र शहरात सकाळपासून विज नसल्याने कार्यालयातील इलेट्रॉनिक सर्व उपकरणे बंद पडली होती. बॅटरीवर चालणाऱ्या इन्व्हर्टरचा बॅकअप पॉवर संपला होता. अर्ध्या तालुक्यात विज पुरवठा खंडीत असल्याने बहुतांशी आस्थापना, कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक साधनांवर चालणारे सर्व व्यवहार बंद होते. तहसिल कार्यालयातही विज नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी विज वितरण कंपनीला संपर्क साधून विज पुरवठा खंडीत असल्याचे कळवले तसेच विज पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याची माहिती विचारली. परंतु, त्यांना अहमदनगरवरुन विज पुरवठा खंडीत असल्याचे सांगण्यात आले. परिणामी ऑनलाईन बैठकीला शेवगाव विभागातील अधिकारी हजर नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधत चांगलेच सुनावताना 'त्या' अधिकाऱ्यांना तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्याचे फर्मान सोडले. वरिष्ठांचा आदेश मिळताच विनाविलंब तीनही अधिकारी अहमदनगरकडे रवाना झाले. गत सोमवार ( दि. ६ ) रोजीही विज पुरवठा नसल्याने 'त्या' अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहता आले नव्हते, अशी माहिती मिळत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयShevgaonशेवगावPathardiपाथर्डी