शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शेवगाव तालुक्यातील शेतकरी आंदोलनावरुन राजकीय पटलावर ‘गोळीबार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:26 IST

शेवगाव तालुक्यात ऊस दर वाढीवरुन आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यातील जखमी शेतक-यांची भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. या गोळीबारावरुन राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तर काँग्रेसने सातारा आणि नगरमधील प्रकरणांवरुन स्वतंत्र गृहमंत्र्यांची मागणी केली आहे.

अहमदनगर : शेवगाव तालुक्यात ऊस दर वाढीवरुन आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यातील जखमी शेतक-यांची भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. या गोळीबारावरुन राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तर काँग्रेसने सातारा आणि नगरमधील प्रकरणांवरुन स्वतंत्र गृहमंत्र्यांची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना निशाणा केला़ मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तो फेटाळत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. आता शिवसेनेकडून शेतकरी गोळीबारावरुन भाजपला घेरण्याची तयारी सुरु आहे.गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जखमींची भेट घेत शेतक-यांवरील गोळीबारावरुन सरकारवर टीका केली़ शेतक-यांवरील गोळीबारावरुन सरकारला हिवाळी अधिवेशनात घेरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीही जखमींची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. विखे म्हणाले, एफआरपीनुसार ऊस दर न देणा-या कारखान्यांवर सरकारने कारवाई करावी. त्यांचे होणी हात धरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाची खाती त्यांच्याकडेच ठेवली आहेत. गृहखाते प्रभारी आहे़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवरच वचक नाही. सांगली व नगरमधील घटना पाहता पोलीस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांवर गोळीबार करणा-या पोलिसांना तत्काळ निलंबीत करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याला स्वतंत्र मंत्री द्यावा, अशी मागणी विखे यांनी केली. त्यामुळे स्वतंत्र गृहमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आज (शुक्रवारी, दि़ १६) जखमी शेतक-यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फोनवरुन या शेतकरी गोळीबाराची सविस्तर माहिती घेतली आहे. त्यामुळे शिवसेनाही या मुद्यावरुन सरकारला घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील