शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी कालव्यात वाहून गेलेले सोने तीन दिवसांनी सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 14:46 IST

पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डावा कालवा लगात असणाºया सिद्धेश्वरवाड्यात एका महिलेचे अडीच तोळे सोने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. हे सोने तीन दिवसानंतर पुन्हा याच परिसरात सापडले आहे.  

जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डावा कालवा लगात असणाºया सिद्धेश्वरवाड्यात एका महिलेचे अडीच तोळे सोने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. हे सोने तीन दिवसानंतर पुन्हा याच परिसरात सापडले आहे.  पारनेर तालुक्यातील गुणोरे येथून जवळे, सांगवी सूर्या मार्गे पारनेरकडे वैशाली दामू औटी त्यांचा मुलगा दुचाकीवरुन बुधवारी दुपारी चालले होते. यावेळी ते दोघे माळवाडी येथील सिद्धेश्वर ओढ्यावरील असणाºया पुलावरून जात होते. यावेळी दुचाकीस्वाराचा तोल गेला. यामुळे वैशाली यांच्या हातातील पिशवी पाण्यात पडली. यावेळी कुकडीच्या कालव्याला पाणी वहात होते. यात ही पिशवी वाहून गेली. सदर महिलेने तातडीने पाण्यात उडी घेतली परंतु ती पिशवी हात लागली नाही. वैशाली औटी यांनी तीन दिवसानंतर शनिवारी ज्याठिकाणी पिशवी गेली होती त्या परिसरात शोधाशोध केली. यावेळी त्यांना जवळ असलेल्या बंधाºयात तरंगताना पिशवी दिसली. ही पिशवी लोकांच्या मदतीने बाहेर काढली. त्यावेळी त्यात असणारी सोन्याचे दागिने असलेला डब्बा तसाच मिळाला. सदर महिलेने कर्मचारी नामदेव बरशिले व परिसरातील शेतक-यांचे आभार मानले.महिलेचे वाचविले प्राणवैशाली औटी या महिलेने पिशवी शोधण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती. यावेळी कुकडी डावा कालव्याचे कर्मचारी नामदेव बरशिले यांनी परिसरात असणाºया शेतकºयांच्या मदतीने सदर महिलेला पाण्याबाहेर काढले. तिला धीर देत सांगितले की, तुझ्या घरी तुझे सोन्यासारखी मुले, पती, कुटुंब आहे. त्यामुळे तुझ्या सोन्यापेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे. सोने पुन्हा करता येईल असा आधार दिला. तीन दिवसानंतर दिवसांनी पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा शोध घेऊ, असे सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरGoldसोनंWomenमहिला