शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणणार : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:06 IST

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोणी (अहमदनगर) : गोदावरी खोरे राज्यातील सगळ्यात मोठे खोरे आहे. या खो-याचे आपण नियोजन पूर्ण केले आहे. त्यासाठी दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व बाबी आम्ही या जलआराखड्यात समाविष्ट केल्या आहेत. हा जल आराखडा तयार करताना त्यांच्या सर्व सुचनांची व सगळ्या बाबींची काळजी घेऊन तो आराखडा राज्य सरकारने मंजूर केला. पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त लोणी (ता. राहाता) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले, २९ उपखो-यांचा समावेश असलेल्या सर्वात मोठ्या गोदावरी खो-याचा संपूर्ण जलआराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. एवढा मोठा जलआराखडा मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणून या भागातील जलसंकट दूर करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. पाण्याच्या तुटीमुळे उत्तर महाराष्ट्र विरुध्द मराठवाडा असा जलसंघर्ष पहायला मिळाला. दोन दोन जिह्यातील जलसंघर्ष पहायला मिळाला. हे वाईट चित्र व संघर्ष बदलण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास तत्वत: मान्यता दिली आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे जे नियोजन होते, ते आपण प्रत्यक्षात आणू शकलो, तर तीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल. त्यांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे नियोजन पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील व प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकरी जलनियोजनातून समृध्द होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि.प. अध्यक्षा शालिनी विखे, आमदार शिवाजी कर्डिले, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील