शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या रुपाने आम्हाला देवच भेटला..मढीतील गरीब कुटुंबातील महिलेची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 14:20 IST

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व देश लढण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत.  तर अनेकांची रोजंदारी बंद झाल्याने उपासमार सुरू आहे. श्रीक्षेत्र मढी येथे असलेल्या अनेक भटक्या कुटुंबीयांना संगम प्रतिष्ठानने या कुुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मदतीचा हात दिला. तुमच्या रूपाने आम्हाला देवच भेटला.. भारतीय संस्कृती खरोखरच जगात सर्वश्रेष्ठ आहे, याचा प्रत्यय आल्याचे फातिमा आतार आणि सुवर्णा जाधव या महिलांनी सांगितले.

मतीन मनियार/मढी : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व देश लढण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत.  तर अनेकांची रोजंदारी बंद झाल्याने उपासमार सुरू आहे. श्रीक्षेत्र मढी येथे असलेल्या अनेक भटक्या कुटुंबीयांना संगम प्रतिष्ठानने या कुुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मदतीचा हात दिला. तुमच्या रूपाने आम्हाला देवच भेटला.. भारतीय संस्कृती खरोखरच जगात सर्वश्रेष्ठ आहे, याचा प्रत्यय आल्याचे फातिमा आतार आणि सुवर्णा जाधव या महिलांनी सांगितले.    संगम प्रतिष्ठानच्या वतीने भटक्या व बाहेरून आलेल्या कुटुंबीयांना शनिवारी किराणा व भाजीपाल्याचे वाटप केले. या मदतीने हे सर्व कुटुंबीय भारावून गेले होते. या मदतीने गरीब कुटुंबांची चूल पेटली आहे.  चांगली माणसं समाजात असल्यानेच भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.            संगम प्रतिष्ठानच्या वतीने माजी सरपंच देवीदास मरकड, सुधीर मरकड, भाऊसाहेब निमसे आदी मित्रमंडळींनी मिळून गहू, तांदूळ, तेल, शेंगदाणे साखर आदी किराणा माल व भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू मढी गावातील अनेक गरीब कुटुंबांना वाटप केले. आमच्या मित्रमंडळीनी एकत्रितपणे विचार करून परस्परांशी संपर्क करून या सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू स्वखर्चाने खरेदी करून गरिबांपर्यंत पोहोचवल्या. गरिबांची  या मदतीने चूल पेटली याचे मोठं समाधान असल्याची भावना देवीदास मरकड यांनी व्यक्त केली. यावेळी दानशूर ग्रामस्थ दिगंबर मरकड, भाऊसाहेब पाखरे, पारस गांधी, संगम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते  यांंनी मदतीसाठी सहकार्य केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीSocialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या