शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २९ हजार कुटुंबांना ‘न्याय’चा अनुभव देणार-सत्यजीत तांबे; प्रदेश युवक कॉँग्रेसचा प्रतिकात्मक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:26 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (२१ मे) महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने ‘अनुभव न्याय मिळाल्याचा’ या न्याय योजनेसारखी योजना केंद्र सरकारने सुरू करावी, अशी मागणी करणारा प्रतिकात्मक कार्यक्रम राबविणार आहे. राज्यातील २९ हजार कुटुंबांना न्याय योजनेचा अनुभव देणार आहे, अशी माहिती युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली. 

संगमनेर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (२१ मे) महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने ‘अनुभव न्याय मिळाल्याचा’ या न्याय योजनेसारखी योजना केंद्र सरकारने सुरू करावी, अशी मागणी करणारा प्रतिकात्मक कार्यक्रम राबविणार आहे. राज्यातील २९ हजार कुटुंबांना न्याय योजनेचा अनुभव देणार आहे, अशी माहिती युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.  कॉँग्रेस पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत न्याय योजनेचे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. वार्षिक उत्पन्न १ लाख ४४ हजार पेक्षा कमी असलेल्या सर्व कुटुंबांना कॉँग्रेस सरकारकडून दरमहा सहा हजार रूपये म्हणजेच दोनशे रूपये प्रतिदिन थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा होतील. अशी ही योजना होती. कुटुंबातील महिलेच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. जेणेकरून या पैशाचा दुरूउपयोग होणार नाही. अशी तरतूद या योजनेमध्ये होती. मात्र, केंद्रामध्ये कॉँग्रेसचे सरकार न आल्यामुळे न्याय योजनेची अंमलबजावणी होवू शकली नाही.     सध्या कोरोनाच्या संकटामध्ये संपूर्ण देश होरपळून निघाला आहे. आरोग्य आणि अर्थव्यवस्था मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने केंद्र शासनाकडे न्याय सारखी योजना सुरू करण्याची मागणी करीत आहेत. गरजू कुटुंबियांच्या बॅँक खात्यात महिना सहा हजार रूपये जमा करावेत. जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पुढील सहा महिन्यांसाठी अशीच एखादी योजना सुरू करावी. गरजूंना न्याय देण्याचे काम करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक  कॉँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, असेही तांबे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबे