पारनेर : जिल्हा क्रीडा कार्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, वासुंदे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पारनेर तालुका शालेय मैदानी स्पर्धेत मुलींच्या गटात काजल लोखंडे, प्रियंका पाबळे, रेश्मा बोदगे, दीपाली डुबे-निघोज, स्वप्नाली दुधाडे, दिव्या औटी-पारनेर, वर्षा नरसाळे, प्रियंका नरसाळे यांनी वेगवान धावपटुंचा बहुमान पटकावला. न्यू इंग्लिश स्कूल पारनेर, साईनाथ विद्यालय अळकुटी, मुलिकादेवी विद्यालय, निघोज, भैरवनाथ विद्यालय, वाळवणे यांनी सर्वाधिक विजेतेपद मिळविले.पारनेर येथील तालुका क्रीडा संकुलावर पारनेर तालुका शालेय मैदानी स्पर्धा तालुकाध्यक्ष बापूराव होळकर, न्यू इंग्लिश स्कूल वासुंदेचे प्रकाश इधे, दत्तात्रय औटी, भाऊसाहेब खामकर, अशोक चेमटे, सुनील टोणपे, दिलीप दुधाडे, सोमनाथ वाकचौरे, गिताराम रांधवण यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.प्रियंका नरसाळे, वर्षा नरसाळे यांनी दोनशे व चारशे मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील चौदा, सतरा, एकोणीस वर्षे वयोगटातील अनुक्रमे निकाल- शंभर मीटर धावणे- स्वप्नाली दुधाडे, न्यू पारनेर,-दिव्या औटी- पारनेर, सुरेखा खाडे, जामगाव,-वैष्णवी आंगे्र, टाकळीढोकेश्वर, वैशाली बांगर, वडझिरे, दोनशे मीटर- पायल रसाळ-निघोज,श्रृतीका धोंगडे- कन्या टाकळी, ऐश्वर्या पठारे-सुपा, चारशे मीटर-प्रियंका नरसाळे,अळकुटी, अनिता हिंगडे- वासुंदे, दीपाली शिंदे- दरोडी, निशा गोरडे-अळकुटी, प्राजकता खोडदे, गांजीभोयरे, सहाशे मीटर- काजल लोखंडे-निघोज, चंद्रकला पवार- जामगाव, आठशे मीटर-आरती गुंजाळ, जामगाव, प्रियंका पाबळे, निघोज, पुजा नायकोडी, अळकुटी, दीडहजार मीटर- कोमल ठाणगे, तिखोल, दीपाली डुबे-निघोज, प्रियंका भोसले-अळकुटी, तीन हजार मीटर- पूजा पठारे, न्यू पारनेर, रेश्मा बोदगे-निघोज, सोनाली ठाणगे, टाकळीढोकेश्वर, सोनाली पठारे- जवळा, पाच हजार मीटर- प्रतीक्षा आढाव, जवळा, प्रणिता लोखंडे, निघोज.तीन कि.मी. चालणे-सोनाली टोपले, ढवळपुरी, शुभांगी भालेकर, न्यू पारनेर,क्राँसकंट्री-रेश्मा बोदगे,निघोज, विशाखा रेपाळे- पारनेर, उंच उडी-निकीता काळे, वाळवणे, सुजाता शिंदे-वासुंदे, पल्लवी पठारे- वाळवणे, प्रणाली रोकडे-वासुंदे, वर्षा चितळकर, सुपा, ऋतुजा दाते, वासुंदा.लांब उडी-रूपाली कुटे, वाळवणे, वेदेश्वरी मते, न्यू पारनेर, दिव्या औटी, न्यू पारनेर, प्रणाली रोकडे, वासुंदे, प्राजक्ता खोडदे, गांजीभोयरे, करूणा कावरे, न्यू पारनेर.गोळाफेक- शुभांगी थोरात-वाळवणे, वृषाली दळवी, हंगा, उज्ज्वला शिंदे, पोखरी, आशा पठारे, सुपा, माया साठे, न्यू पारनेर.थाळीफेक-अनुसया घुले-आयझॅक, भाळवणी, कोमल गुळवे, गांजीभोयरे, सुप्रिया खणसे,गांजीभोयरे, प्रियंका मंचरे, ढोकेश्वर, ललिता चौधरी, पारनेर महाविद्यालय, भालाफेक- रूपाली निमोणकर, गांजीभोयरे, अर्चना आंग्रे, ढोकेश्वर, तिहेरी उडी-पल्लवी पठारे- वाळवणे, निलम झावरे, वासुंदे यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पारनेरमधील मुली वेगवान धावपटू
By admin | Updated: September 19, 2014 23:40 IST