शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मारहाणीमुळेच गिरवलेंचा मृत्यू- पत्नीचा कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:55 IST

कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निर्मला यांनी केलेला तक्रारअर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ठळक मुद्दे गिरवले यांच्या मृत्यूनंतर शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निर्मला यांनी केलेला तक्रारअर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.सीआयडीकडे तपास सोपविणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर गिरवले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी त्यांच्या नातेवाईकांनी दर्शविली आहे.सायंकाळी ४ वाजता अमरधाम येथे गिरवले यांचा अंत्यविधी होणार आहे.

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडनंतर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील आरोपी नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी रात्री पुण्यात मृत्यू झाला. गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. गिरवले यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असून, पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांनी केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निर्मला यांनी केलेला तक्रारअर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.दरम्यान गिरवले यांच्या मृत्यूनंतर शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलीस मारहाणीत गिरवले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून गुन्हा दाखल होईपर्यत अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका घेतली होती. मात्र, आता सीआयडीकडे तपास सोपविणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर गिरवले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी त्यांच्या नातेवाईकांनी दर्शविली आहे. कैलास गिरवले यांचे शव घेऊन रुग्णवाहिका नगरमध्ये दाखल झाली आहे. गिरवले यांच्या घरासमोर मोठा जमाव जमला असून, फुलांनी सजविलेली शववाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता अमरधाम येथे गिरवले यांचा अंत्यविधी होणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडahmednagar policeअहमदनगर पोलीस