शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गवार, शेवगा पोहोचला शंभरी पार; भेंडी, कारल्यानेही खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 16:52 IST

कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे.

अहमदनगर : कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे.हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मंडई, बाजारात काही मोजक्याच भाजीपाल्याची आवक वाढली. यामध्ये टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लावर, ढोबळी मिरची आदींचा समावेश आहे. हा भाजीपाला काहीसा रास्त भावात मिळतोय. मात्र गवार, शेवग्याच्या शेंगांची आवक अत्यंत कमी आहे. त्यामुळे या दोन्ही भाज्यांसाठी प्रतिकिलोला १०० ते १२० रूपये मोजावे लागत आहेत. त्यातच बटाटाही गेल्या महिनाभरापासून ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे. याशिवाय भेंडी, कारले, दोडका, वटाणा, आदींनीही भाव खाल्ला आहे. कांद्याची आवक वाढली असली तरी त्याच्या भावात फारसा फरक पडलेला नाही. कांदाही ५० ते ६० रूपये किलोच्या दराने खरेदी करावा लागत आहे. भाजीपाल्याचा दर असे..(रूपये प्रतिकिलो)शेवगा, गवार- १००-१२०, आले, भेंडी, दोडका- ८०-१००, बिन्स, कारले, वटाणा- ५०-६०, ढोबळी मिरची, वांगी, फ्लावर, कोबी, डिंगरी-४०-५०,  बटाटे, मिरची- ३०-४०, टोमॅटो, गाजर- २०-३०. मेथी, पालक, कोथिंबीर जुडी-१० रूपये.

गेल्या काही दिवसांपासून वारंवार बदलणा-या हवामानाचा भाजीपाल्याच्या पिकांवर परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेवगा, गवारीला बसला आहे. शेवग्याला पुरेसी फुलेच न लागल्याने त्याचे उत्पादन घटले तर गवारीवरही रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे बाजारात या दोन्ही पिकांची आवक अत्यंत कमी आहे, असे श्रीगोंदा येथील शेतकरी संदीप शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरvegetableभाज्याBaazaarबाजार