शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गौतमीच्या आदाकारीने महिलांनाही भुरळ; चक्क स्टेजवरून खाली येत म्हसवंडी गावात महिला प्रेक्षकांमध्ये केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 11:04 IST

ना गडबड ना गोंधळ गावाचं परफेक्ट नियोजन ठरलं सक्सेसफुल....

घारगाव (जि. अहमदनगर) :  संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे कला व सांस्कृतिक महोत्सव निमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे शनिवारी (१३ मे) रोजी आयोजन करण्यात आले होते. नेहमी स्टेजवर आपल्या डान्सनं सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलनं यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत महिला प्रेक्षकांमध्येच एंट्री घेतली. या कार्यक्रमावेळी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं.

गौतमीनं फिल्मी अंदाजात एंट्रीने  महिलांनी देखील ठेका धरला.  मात्र, या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलच्या शोची वेगळीच चर्चा रंगली होती. हा कार्यक्रम कुठलाही तंटा, भांडणे न होता निर्विघ्न पार पडला. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.म्हसवंडी म्हणजे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा जल आकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले गाव होय. येथे कला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रील स्टार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गौतमी पाटीलच्या आतापर्यंत जवळपास अनेक कार्यक्रमामध्ये राडा होताना पाहायला मिळाला. कुठेही कार्यक्रम असला की कार्यक्रम मधूनच बंद करायला लागत असे.मात्र, या कार्यक्रमात संपूर्ण गावाने सहभाग घेत तिच्या कार्यक्रमाला दाद दिली. गौतमी नाचता नाचता मध्येच स्टेजवरून खाली उतरली. शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या आजी देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्या होत्या. गौतमीनं स्टेजवरून महिला प्रेक्षकांमध्ये एंट्री घेतली. गौतमी खाली उतरताच महिला प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. स्टेजवरून खाली उतरताच गौतमीनं चंद्रा गाण्यावर ठेका धरला.

चंद्रा गाण्यावर बेधुंद नाचणाऱ्या गौतमीसमवेत शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या यांनीही ठेकाधरत नाचायला सुरवात केली. त्यांना आवरण्यात घारगाव पोलिसांना तर दमछाक झाली. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी बॉडीगार्ड यांचेही नियोजन केलं होतं. या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला. ग्रामस्थांचं योग्य नियोजन आणि तरुणाईच्या समंजसपणामुळं गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडला. म्हसवंडीतील कार्यक्रमात कसल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच  व्हायरल होत आहे.

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलAhmednagarअहमदनगर