शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 06:16 IST

माझ्या रक्तात लाचारी नाही, मी सत्तालोलूपही नाही, पण तुम्ही तर खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला.

शिर्डी / अहमदनगर : माझ्या रक्तात लाचारी नाही, मी सत्तालोलूपही नाही, पण तुम्ही तर खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला.पंतप्रधान मोदी यांच्या पाठोपाठ रविवारी शिर्डीत येऊन उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मुंबईतील दसरा मेळाव्यात मोदींवर टीका टाळणाऱ्या उद्धव यांच्या आजच्या भाषणात मात्र मोदी हेच टीकेचे लक्ष्य होते. ‘कसं काय पाहुणं बरं हाय का’ हे गाणे म्हणत त्यांनी मोदींच्या भाषणाची नक्कलही केली.ते म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी काही लोक साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. २०१९ मध्ये पुन्हा आम्हालाच सत्ता द्या, असे साकडेही त्यांनी साईबाबांना घातले, पण पाच वर्षे सत्ता देऊन तुम्ही काय दिवे लावले? असा सवाल साईबाबांनी त्यांना केला असेल. खोटे बोलण्यात ते पटाईत आहेत. आता २०२२ पर्यंत सगळ्यांना घरे देणार, असे सांगून शिर्डीत चावी मारून गेले,’ असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता लगावला.सत्तेतून का बाहेर पडत नाही, असा सवाल करणाºयांनाही उद्धव यांनी जोरदार उत्तर दिले. ‘आम्ही सत्तेतून कधीही बाहेर पडू शकतो, पण सत्तेत राहून त्यांच्या डोक्यावर बसून काम करून घेता येत असेल तर का बाहेर पडू? शेतकºयांचे प्रश्न, दुधाला भाव, पाणी देत असाल, तर पाचशे वर्षे सत्ता देऊ, पण तुम्ही केवळ खोटे बोलून सत्ता मिळविता़, अन्याय, अत्याचारावर कुणी बोलले तर त्याला देशद्रोही, विकासाचे विरोधक ठरविता. तुम्ही तर नवे मोगल निघालात’, असा हल्ला ठाकरे यांनी चढविला.सभास्थानी श्रीरामचे मोठे कटआउट लावण्यात आले होते. आगामी काळात राममंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातभाजपाची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून आला. राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम ही सगळी तुमची जुमलेबाजी आहे का, असा सवाल करत ‘मंदिर नही बनायेंगे’ असे एकदा सांगून टाका़ मग आम्ही काय करायचे ते करतो़, असे आव्हान उद्धव यांनी दिले.>शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळाराज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, परंतु लाखो शेतकºयांना अद्याप एक छदामही मिळालेला नाही. मग हे पैसे गेले कुठे? असा सवाल करत कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे यांनी अहमदनगर येथील सभेत केला. आजचं नगर म्हटले की, विखे, कर्डिले अन् छिंदम समोर येतात. ज्या पक्षाचा नगरसेवक छिंदम आहे, तो पक्ष कसा असेल, याचा विचार करा. निवडून दिलेल्या खासदाराला नगर ओळखत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांनाही नगरकर जनता ओळखणार नाहीत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे