शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलवर जाऊन मंत्री गडाख यांनी जाणल्या डवरी समाजाच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 13:55 IST

नेवासा तालुक्यातील सोनई येथील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीवर मोटारसायकलीने जाऊन मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वस्तीवरील नागरिकांना तुमच्या भोजनाची तातडीने व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून धीर दिला. तशी जेवणाची व्यवस्थाही त्यांनी तातडीने केली.

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई येथील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीवर मोटारसायकलीने जाऊन मंत्रीशंकरराव गडाख यांनी रविवारी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वस्तीवरील नागरिकांना तुमच्या भोजनाची तातडीने व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून धीर दिला. तशी जेवणाची व्यवस्थाही त्यांनी तातडीने केली.       मृद व जलसंधारण मंत्रीशंकरराव गडाख हे गेल्या काही दिवसांपासून थेट मोटारसायकलने जात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याबाबत उपाययोजना करीत आहेत. मंत्री गडाख यांनी रविवारी सोनई येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीने जात भेट दिली. तेथे कोरोना व्हायरसची माहिती देत घ्यावयाची प्रतिबंधात्मक काळजी समजावून सांगत लोकांच्या अडचणी समजावून घेत मी तुमच्या बरोबर असल्याचे सांगत धीर दिला.भोजनाची केली व्यवस्था    बंदमुळे काम नसल्यामुळे उपासमार होत असल्याचे डवरी समाजाच्या वस्तीवरील नागरिकांनी सांगितले. यावेळी नामदेव सावंत, मोहन शेगर, साहेबराव शिंदे, भागाबाई सावंत, रुपाबाई शिंदे यांनी वस्तीवर समस्या मांडल्या. त्यावर मंत्री गडाख यांनी भोजनाची व्यवस्था होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांची जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली.घरात रहा, सुरक्षित रहामुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कौशल्याने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत. या संकटाचा सामना करताना सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. घरी थांबून, गर्दी टाळून आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. सरकार सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहे. घरात रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन मंत्री गडाख यांनी ग्रामस्थांना केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाministerमंत्रीShankarrao Gadakhशंकरराव गडाख