शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यात ई-नाम योजनेचा फज्जा; पारंपरिक बोली पद्धतीनेच होतात लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:43 IST

श्रीरामपूर : केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी बाजार ही योजना २०१६ पासून सुरू केली होती. पारंपरिक पद्धतीच्या लिलावाऐवजी आॅनलाईन लिलावाद्वारे शेतमालाच्या खरेदी विक्रीचे यात उद्दिष्ट होते.  शेतक-यांना कुठेही मालाची विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळून वाढीव दर मिळेल, असे सांंगितले गेले. मात्र नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचा आढावा घेतला असता ही योजना कुठेही कार्यान्वित नसल्याचे समोर आले.

शिवाजी पवार । 

बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाईन लिलावासाठी ई-नाम हे व्यापार पोर्टल तयार करण्यात आले होते. जिल्ह्यातील नगर, नेवासा,   राहुरी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर या बाजार समित्या ई-नामशी जोडण्यात आल्या. सरकारने त्यासाठी प्रत्येक समितीला ३० लाख रुपये दिले. त्यातून संगणक, प्रिंटर, राऊटर यांच्या खरेदीसह शेतमालाच्या गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली.

काय आहे ई-नामडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल २०१६ मध्ये योजनेस सुरवात झाली. यानुसार शेतक-यांना ई-नाम पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर बाजार समितीत शेतमाल आणल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणी केली जाते. त्याचा अहवाल शेतक-याला मिळतो.

शेतमालाचा फोटो पोर्टलवर अपलोड केला जातो. त्यानंतर मोबाईल अ‍ॅपवरून देशातील कोणताही व्यापारी कुठेही बसून लिलावात भाग घेऊ शकतो. व्यापारी आणि शेतक-यांना ही प्रक्रिया आॅनलाईन दिसते. शेतकरी मिळणा-या दराबाबत समाधानी असेल तरच मालाची खरेदी-विक्री होते, अशी प्रक्रिया असणारी ही ई-नाम योजना आहे.

योजनेची वैैशिष्ट्येया लिलाव प्रक्रियेत आडते आणि मध्यस्थ नाहीत. मालाचे वजन झाल्यानंतर प्रत्यक्षात आडत्याला त्याचा ताबा मिळण्यापूर्वीच शेतक-यांच्या खात्यावर आॅनलाईन पैैसे जमा केले जातात. देशातील कोणत्याही बाजारात मालाची विक्री करता येते.

नगर जिल्ह्यातील स्थितीनगर : काही प्रमाणात भुसाराची  ई-नामद्वारे खरेदी सुरू झाली आहे. मात्र आडत्यांवर सक्ती करताच ते व्यवहार बंद पाडतात. आडते व्यवहार करायला तयार नाहीत.

श्रीरामपूर : अद्यापही योजना कार्यान्वित झालेली नाही. 

संगमनेर : आपले सर्व व्यवहार केंद्र सरकारला माहिती होतील या भितीने आडते या प्रणालीतून      खरेदी करत नाहीत. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे दिवसभरात निम्म्या मालाची सुद्धा खरेदी होणार नाही.

नेवासे : कांद्यामध्ये अनेक प्रकारचे वक्कल (मालाचा दर्जा) असतात. त्यामुळे आॅनलाईन खरेदी विक्री शक्य नाही. 

राहुरी :  ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. दबाव टाकून आडते राजी होत नाहीत. 

लिलाव खरेदीला तांत्रिक अडचण नाही. आडते तयार होत नाहीत हे खरे आहे. नगर जिल्ह्यासाठी आम्ही नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. ते ई नाम प्रकियेवर लक्ष ठेवतात.-महेंद्र लोखंडे, सहायक सरव्यवस्थापक, महाराष्ट्र प्रदेश पणन मंडळ.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड