शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघांना अजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:46 IST

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने अजन्म कारावास व प्रत्येकी ३२ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आऱएम़ कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. 

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने अजन्म कारावास व प्रत्येकी ३२ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आऱएम़ कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. 

चंद्रकांत आनंदा बर्फे (वय ४४), अमोल चंद्रकांत बर्फे (वय २०), सुरेश आनंदा बर्फे (वय ५७) व शिवाजी आनंदा बर्फे (वय ४५ सर्व रा़ आडगाव ता़ पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

या चौघा आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी ११आॅक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी शेतीच्या वादातून अशोक रभाजी शेंडे यांना मारहण करत त्यांचे अपहरण केले होते. यावेळी अशोक यांनी त्यांचे बंधू राजू शेंडे यांना फोन केला होता. यावेळी राजू यांना अशोक व इतर लोकांमाध्ये वाद सुरू असल्याचे ऐकू आले. यावेळी राजू यांनी शेतात जाऊन पाहिले तेव्हा त्यांना घटनास्थळी कुणी आढळून आले नाही. यावेळी मात्र राजू यांना शेतात भेटलेले माणिक लोंढे यांनी अशोक यांना आरोपींनी मारहाण करून दुचाकीवर बसवून नेले असल्याचे सांगितले. त्यानंतर राजू शेंडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. 

दुस-या दिवशी मात्र अशोक शेंडे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत करंजी-चिंचोडी रोडवरील धारवाडी शिवारात आढळून आला. आरोपींनी मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून देत पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीCrime Newsगुन्हेगारी