शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक मार्गावरील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 15:19 IST

दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात

पारनेर(अहमदनगर) : मुंबईवरून अहमदनगरमधील पारनेरकडे परतणारा छोटा टेम्पो व दुसऱ्या एका टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद शिवारात शुक्रवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास अपघात झाला. मृत चौघेही पारनेर तालुक्यातील करंदी येथील आहेत. ते मुंबईला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असत. सुरेश नारायण करंदीकर (वय ४४), सिद्धार्थ राजेश उघडे (वय २२), आकाश सुरेश रोकडे (वय २६), सुनील विलास उघडे (वय १९, सर्व रा. करंदी, ता.पारनेर) अशी मृतांची नावे आहेत.करंदी येथील सुरेश करंदीकर, सिद्धार्थ उघडे, आकाश रोकडे, सुनील उघडे हे तरूण परिसरातील भाजीपाला खरेदी करून तो मुंबई येथे विक्रीस नेत होते. गुरूवारी सायंकाळी हे तरूण छोटा टेम्पो (क्र. एम. एच. १६ सी. सी. ६८३८८) मधून भाजीपाला घेऊन मुंबईला गेले होते. तेथे भाजीपाला विक्री करून छोट्या टेम्पोतून पारनेरकडे परतत होते. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास वडगाव आनंद (ता. जुन्नर, जि. पुणे) शिवारात समोरून येणाºया टेम्पोने (क्र. एम. एच १६ ए. ई. ९०८०) तरूण प्रवास करीत असलेल्या छोट्या टेम्पोला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात छोट्या टेम्पोचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात वाहनातील चौघाही तरूणांचा जागीच मृत्यू झाला. लॉकडाऊननंतर या चारही तरूणांनी मुुंबई शहरामध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. स्वत:च्या घरचा भाजीपाला तसेच परिसरातील भाजीपाला खरेदी करून ते मुंबईत विक्री करीत होते. त्यांच्या या व्यवसायाचा चांगला जम बसू लागला असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील सुरेश करंदीकर हे विवाहित असून अन्य तिघे अविवाहित होते. अपघाताची माहिती समजल्यानंतर राजेंद्र करंदीकर यांच्यासह शशीकांंत करंदीकर, सुरेश रोकडे, रवींद्र रोकडे, विलास उघडे, निलेश खोमणे, प्रकाश उघडे, सागर करंदीकर, सनी उघडे, जितेंद्र उघडे, रोहित उघडे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदतकार्य केले.