शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पत्रकार दातीर हत्याकांडाला वेगळे वळण; भाजपच्या माजी आमदाराचा मंत्री तनपुरे यांच्यावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 17:21 IST

Rohidas Datir murder: अखेर संगनमताने दातीर यांची हत्या झाली. राजकीय पाठबळ असल्याशिवाय ही हत्या होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवाजी कर्डिले यांनी केली आहे.

अहमदनगर : राहुरी येथील एका सप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. कर्डिले यांनी पोलीस तपासाचा संदर्भ देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड मंत्री तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी दातीर यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असून त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कर्डिले यांनी केला आहे.

दातीर यांच्या हत्या प्रकरणात कर्डिले हे शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्डिले यांच्या आरोपांमुळे या हत्याकांड प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून यामध्ये राज्यमंत्री तनपुरे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पत्रकार दातीर यांचे राहुरी येथून 6 एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोघा आरोपींना अटक केले आहे.

यासंदर्भात बोलताना कर्डिले म्हणाले की, दातीर यांची हत्या झाल्यानंतर राज्यमंत्री तनपुरे हे त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. या घटनेची अम्ही बारकाईने माहिती घेतली आहे. राहुरी येथील पठारे नावाच्या शेतकऱ्याचा 18 एकराचा भूखंड होता. या भूखंडावर नगरपालिकेने आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठवण्यात आले. याच भूखंडावर मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा सोहम याच्या नावाने एका कंपनीची स्थापना करण्यात आली असून या कंपनीत तनपुरे यांचा सख्खा मेहुना देशमुख व दातीर  यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी कान्हू मोरे यांचा मुलगा यशवंत मोरे हे भागीदार आहेत. या भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. दातीर यांना या आधी आरोपींकडून अनेक वेळेस धमक्या आल्या होत्या. त्यांनी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यांना मात्र पोलीस संरक्षण देण्यात आले नाही.

अखेर संगनमताने दातीर यांची हत्या झाली. राजकीय पाठबळ असल्याशिवाय ही हत्या होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असून पोलिसांनी मागितले तर ते पुरावे आम्ही त्यांना देऊ, तसेच या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले पत्रकार परिषद घेऊनच यासंदर्भात बोलणार आहे.

टॅग्स :Prajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिले