कोपरगाव : तालुक्यातील वारी येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनी वारीचे भूमिपुत्र, लष्करातील जवान नायक राजेंद्र काशिनाथ टेके यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपसरपंच मनिषा गोर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक सुखदेव कराळे तर रामेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक सुनील निकाळजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
रामेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन केले. शिक्षक कैलास शेळके यांनी सामुदायिक संविधान वाचन घेत ग्रामस्थांना शपथ दिली. यावेळी सरपंच सतीश कानडे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, माजी सभापती मच्छिंद्र टेके, माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे, विशाल गोर्डे, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, रावसाहेब टेके, बाबासाहेब शिंदे, सचिन टेके, प्रशांत संत, ग्रामपंचायत सदस्य अनिल गोरे, अनिता संत, सुवर्णा गजभिव, अश्विनी खैरनार, ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे, तलाठी दत्तात्रय वडितके, मुख्याध्यापक सुनील निकाळजे उपस्थित होते.