शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
2
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
3
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
4
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
5
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
6
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
7
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
8
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
9
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
10
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
11
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
12
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
13
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
14
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
15
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
16
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
17
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
18
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!

संगमनेरातील १५ संशयीत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 19:47 IST

कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकूण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच सोमवारी प्रशासनाने तत्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

संगमनेर : कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकूण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच सोमवारी प्रशासनाने तत्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी नागरिकांना जाण्यास व येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली.    अहमदनगर जिल्हयातील मुकूंदनगर परिसरात दोन कोरोना रुग्ण सापडले. त्यांची चौकशी केली असता ते जामखेड येथे एका कार्यक्रमात गेल्याचे त्यांनी सांगितले.तेथे त्यांच्यासोबत संगमनेरातील १५ नागरिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला समजली. हे सर्व जामखेडमध्ये दहा दिवस मुक्कामी होते. ही माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ. मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया आदींनी तातडीने या पंधरा जणांचा शहरातील नाईकवाडपुरा, रेहमतनगर, बागवानपुरा येथून १३ जणांना तर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथून एक असे चौदा जणांना ताब्यात घेण्यात आले.    यातील एक ासंशयिताला संगमनेर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. दरम्यान, त्याची प्रकृती ढासळल्याने व त्याच्या आजाराची लक्षणे कोरोनाशी संबंधीत जाणविल्याने तो उपचार घेत असलेल्या रूग्णालयातील डॉक्टरांनी आरोग्य विभागाला कळविले. त्यानंतर त्याच्यासह संपर्कात आलेल्या अन्य चौदा व्यक्तींना पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.या सर्वांच्या कुटुंबीयांसह अन्य व्यक्तींचेही विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयित राहत असलेल्या परिसरातील सर्व रस्ते बंद केले आहेत. हे सर्व आणखी कुणाच्या संपर्कात आले त्याची माहितीही घेण्यात येत आहे.                                 ५३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्हकोरोनाचा प्रादूर्भाव झाल्याच्या संशयावरून संगमनेर परिसरातून एकूण ५३ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या कालावधीत या सर्वांना क्वॉरंटाईनही करण्यात आले होते. टप्याटप्प्याने या सर्वांच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले असून त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरcorona virusकोरोना वायरस बातम्या