शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये प्रवाशांना लुटणारे पाच दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 15:28 IST

नगर शहर व परिसरात प्रवाशांना लुटणा-या दरोडेखोरांच्या दोन वेगवेगळ्या टोळ्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री जेरबंद केल्या आहेत. यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक करत त्यांच्याकडून हत्यारांसह ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहमदनगर : नगर शहर व परिसरात प्रवाशांना लुटणा-या दरोडेखोरांच्या दोन वेगवेगळ्या टोळ्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री जेरबंद केल्या आहेत. यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक करत त्यांच्याकडून हत्यारांसह ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नगर-पाथर्डी रोडवर प्रवाशांचा पाठलाग करून चोरटे लूटमार करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मिळाली होती. माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पथकाने नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी परिसरातील नदीच्या पुलावर सापळा लावला. यावेळी प्रवाशांना लुटताना पथकाने समीरखान नसीरखान पठाण (वय ३३ रा. खंडाळा), बु-हाण दिलावरखान पठाण (वय ४० रा. दोघे ता. वैजापूर, जि़ औरंगाबाद) व संतोष अण्णा सोनवणे (वय २० रा. लोणी बु़ ता. वैजापूर) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पळून गेले़ पकडलेल्या चोरट्यांकडून एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी कटावणी, दोन मोटारसायकल व तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुस-या कारवाईत पथकाने सुपा एमआयडीसी परिसरातून रस्ता लूट करणा-या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली. आदि उर्फ लक्ष्मण कर्डिले (वय २५ रा़ वडझिरे ता़ पारनेर) व पप्पी उर्फ मनिष अशोक सांगळे (शहांजापूर ता़ पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत़ कर्डिले व सांगळे यांच्यावर कोतवाली, एमआयडीसी यासह बाहेरील जिल्ह्यातील आळंदी, यवत, वारजे, नेकनूर, धारूर, वडगाव आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़ नगर रेल्वे स्टेशन परिसरात एका प्रवाशाला व चांदणी चौक येथून एका प्रवाशास बोलेरो जीपमध्ये लिफ्ट देऊन त्यांची लूट केल्याची कबुली आरोपींनी दिली़ आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस