शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

टँकर, दुचाकी आणि रिक्षाचा विचित्र अपघात;पाच जखमी

By admin | Updated: February 26, 2017 16:49 IST

पाण्याचा टँकर, दुचाकी आणि अ‍ॅटोरिक्षांत झालेल्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 26 - पाण्याचा टँकर, दुचाकी आणि अ‍ॅटोरिक्षांत झालेल्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले. यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. सर्व जखमींना घाटीत दाखल करण्यात आले असून एकाजणाची प्रकृती चिंताजनक आहे.हा भीषण अपघात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नंदनवन कॉलनीत घडला. उर्मिला आबासाहेब थोरात(३५), सारिका आबासाहेब थोरात(२०), आबासाहेब थारोत, (४०), स्नेहल आबासाहेब थोरात(१६) आणि दिव्यांगी दिलीप इंगळे(२१)अशी जखमींची नावे आहेत. यावेळी प्रसंगावधान राखून दुचाकीचालक तरुणाने दुचाकी सोडून बाजूला उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला.याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक गंगावणे यांनी सांगितले की, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्याने भरलेला टँकर (क्रमांक एमएच-०४ एजी १८७८)हा नंदनवन कॉलनीतून उतारावरून पुढे जात होता.याचवेळी विरुद्ध दिशेने आबासाहेब थोरात आणि त्यांचे नातेवाईक रिक्षाने (क्रमांक एमएच-२०बीटी ६३७२)शहराकडे जोरात येत होते. आणि दुचाकीचालकही (क्रमांक एमएच-२०ईएस ७६४९)शहराकडे निघाला होता. यावेळी अचानक उतारावरील टँकरचालक अचानक गोंधळला आणि तो थेट रिक्षाला धडकला. या विचित्र अपघातात थारोत कुटुंबासह दिव्यांगी इंगळे ही तरुणीही गंभीर जखमी झाली. यावेळी ट्रकचालक आपल्या अंगावर येत असल्याचे लक्षात येताच दुचाकीस्वाराने दुचाकी सोडली आणि त्याने बाजूला उडी मारल्याने तो बालंबाल बचावला. परंतु त्याच्या दुचाकी मात्र टँकरखाली आल्याने चुरडा झाली.छावणी पोलिसांचे युद्धपातळीवर मदतकार्य अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक गंगावणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लोकांच्या मदतीने सर्व जखमींना एका वाहनातून घाटीत पाठविले.