शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

मोटारसायकल अपघातात दिंडीतील पाच वारकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 15:42 IST

आळंदीकडे निघालेल्या दिंडीमधील वारक-यांना पाठीमागून येणा-या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वारकरी जखमी झाले.

घारगाव : कार्तिकी वारीसाठी आळंदीकडे निघालेल्या दिंडीमधील वारक-यांना पाठीमागून येणा-या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वारकरी जखमी झाले. तर दुचाकीवरील एक जण जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी फाट्याजवळ घडला.  डोळासने येथील रात्रीचा मुक्काम संपवून हे सर्व वारकरी बुधवारी सकाळी घारगाव (ता. संगमनेर) येथे बबन रामचंद्र आहेर यांच्या घरी सकाळचे जेवण करून एक वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने आळंदीकडे जाण्यासाठी निघाले होते. दिंडीच्या पाठिमागून भरधाव निघालेल्या (एम.एच-४१, ए. ई. ९६०२) या हिरव्या रंगाच्या दुचाकीने दिंडीतील वारक-यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात  प्रकाश श्रीधर पाटील, विमल सुरेश निकम, इंदूबाई अर्जुन निकम, गोजाबाई छगन धनगर, कमलाबाई धनगर सर्व (रा.मंगरूळ, ता.चोपडा, जि. जळगाव) हे वारकरी जखमी झाले. जखमींमध्ये ४ महिला आणि १ पुरुष वारक-यांचा समावेश आहे.  दुचाकीवरील भाईदास मधुकर राठोड व लक्ष्मण भिकन चव्हाण दोघेही (रा.तळेगाव, ता.चाळीसगाव, जि. जळगाव) किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही पायी दिंडी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील आहे. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख,संतोष खैरे, विशाल कर्पे, होमगार्ड रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.  

टॅग्स :SangamnerसंगमनेरAccidentअपघात