अहमदनगर: विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळातच बकरी ईद आल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. शहरात पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले असून पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सोमवारी (दि.६) होणार आहे. यानिमित्त नगरमधील कोठला येथील ईदगाह मैदानावर सकाळी ९.३० वाजता नमाज अदा करण्यात येणार आहे. मैदानाभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदनिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मध्य शहरातील मिरवणूक मार्गावर पोलिसांचे फिक्स पॉइंट तैनात करण्यात आले आहेत. ईदगाह मैदान, शहरातील मशिदीच्या अवती-भोवती पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच विविध पोलिसांची खास पथके नजर ठेवणार आहेत.(प्रतिनिधी)
बकरी ईदसाठी पाचशे पोलीस तैनात
By admin | Updated: October 5, 2014 23:56 IST