शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव वेशीवर प्रथमच फडकला भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:54 IST

सर्वांचीच उत्कंठा लागलेल्या महापालिका निवडणुकीत केडगाव उपनगरात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला. येथील सेनेचे सेनापती दिलीप सातपुते

योगेश गुंडकेडगाव : सर्वांचीच उत्कंठा लागलेल्या महापालिका निवडणुकीत केडगाव उपनगरात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला. येथील सेनेचे सेनापती दिलीप सातपुते यांच्या पराभवाने मात्र ‘गड आला पण सिंह गेला’ अशी काहीशी शिवसेनेची अवस्था झाली तर भाजपच्या मनोज कोतकर यांनी सातपुते यांना शह देत विजय खेचून आणला़ काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जाणारे केडगाव या निवडणुकीत काँग्रेसमुक्त झाले.केडगावमधील सर्व कोतकर समर्थक उमेदवारांनी काँग्रेस सोडून भाजपकडून उमेदवारी केली होती. त्यात काँग्रेसनेही उमेदवार मैदानात उतरवल्याने सेनेने मोठा जोर लावला. या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे केडगावच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथील प्रभाग १६ व १७ या दोन प्रभागात सेना आणि भाजप यांच्यात जोरदार लढाई झाली. प्रभाग १६ मधून सेनेचे अमोल येवले, विजय पठारे, सुनीता कोतकर व शांताबाई शिंदे या चारही उमेदवारांनी विजय मिळविला़ याच प्रभागात काँग्रेसने ऐनवेळी मैदानात उतरविलेल्या उमेदवारांनी हजार मतांचा टप्पा ओलांडल्याने भाजपच्या कोतकर समर्थक उमेदवारांची पिछाडी सुरु झाली. काँग्रेसची उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखी ठरल्याने या प्रभागात सेनेच्या चारही जागा मोठ्या फरकाने निवडून आल्या.प्रभाग १७ मधून दिलीप सातपुते व मनोज कोतकर यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र कोतकर यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. कोतकर यांच्या सोबत लता शेळके, गौरी ननावरे, राहुल कांबळे या भाजपच्या चारही उमेदवारांचा विजय झाला. सेनेच्या मोहिनी संजय लोंढे आणि काँग्रेस पुरस्कृत शिवाजी लोंढे यांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला.केडगावमधून सुनील कोतकर, सुनीता कांबळे, मोहिनी संजय लोंढे, दिलीप सातपुते या विद्यमान नगरसेवकांचा या निवडणुकीत पराभव झाला.सातपुते यांचा पराभव केडगाव सेनेच्या जिव्हारीकेडगावमधील सेनेच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेणारे दिलीप सातपुते यांना मात्र यावेळी मतदारांनी नाकारले. त्यांनी घडवलेले सेनेचे कार्यकर्ते नगरसेवक झाले आणि ते स्वत: केडगावमधून पराभूत झाले. त्यांचा पराभव सेनेच्या केडगावमधील नवनिर्वाचित नगरसेवकांनाही दु:खदायक ठरला.कोतकरांचा भाजप फॅक्टर फ्लॉपएका रात्रीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केडगावमध्ये कमळ फुलविणे कोतकर यांना या निवडणुकीत चांगलेच महागात पडले. प्रभाग १६ मध्ये तर मतदारांना हे चित्रच आवडले नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले. काँग्रेसने आव्हान उभे केल्याने प्रभाग १६ मध्ये भाजपला मोठा फटका बसला. त्यात प्रभाग १७ मध्ये सर्वपक्षीय कोतकर एकत्र आल्याने मतदारांनी त्यांच्या एकीला स्वीकारत भाजपला कौल दिला.विजय पाहण्यासाठी माझे पती हवे होतेकेडगाव हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेले संजय कोतकर यांच्या पत्नी सुनीता कोतकर यांचा या निवडणुकीत विजय झाला. माझ्या पतीने व मी केडगावमध्ये अनेकवेळा निवडणुका लढविल्या पण सेनेला यश मिळत नव्हते. आज केडगावमधील लोकांनी मला विजयी केले पण हा विजय पाहण्यासाठी माझे पती नाहीत,अशी खंत कोतकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका