शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 07:56 IST

साई मंदिराच्या लगत व पालखी रोडला असलेल्या एका हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री एका सेवानिवृत्त जवानाने गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देगोळीबार वादातून झाला का?, पोलीस करताहेत तपाससेवानिवृत्त पुष्कराज सिंगविरोधात गुन्हा दाखलगोळीबारामुळे परिसरात खळबळ

शिर्डी - साई मंदिराच्या लगत व पालखी रोडला असलेल्या एका हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री एका सेवानिवृत्त जवानाने गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुष्पराज रामप्रसाद सिंग असे या 38 वर्षीय जवानाचे नाव आहे. मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेले पुष्पराज रामप्रसाद सिंग आपल्या काही मित्र व भावासोबत मध्यरात्री शिर्डीला आले होते.

त्यांनी पालखी रोड येथे हॉटेल कौशल्या येथे रूम बूक केली. यावेळी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. त्याने नवीन गाडी घेतली त्या आनंदात त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी औताडे यांच्या फिर्यादीनुसार पुष्कराजवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस उपाधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक खरात अधिक तपास करत आहेत. संबंधित जवानाकडे बंदुकीचा परवाना आहे. पुष्कराज सिंग मद्यधुंद असल्याचेही समजते. दरम्यान, हा गोळीबार  वादातून झाला की आनंदातून? हे तपासाअंती स्पष्ट होईल. 

टॅग्स :shirdiशिर्डीFiringगोळीबारAhmednagarअहमदनगर