शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जवळेत घराला आग; संसारोपयोगी वस्तू खाक, चार लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 17:14 IST

पारनेर तालुक्यातील जवळे येथील बरशिले वस्तीवर राहणा-या प्रवीण नामदेव बरशिले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील चार लाख रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी (दि.७ मार्च) संध्याकाळी ही घटना घडली. 

जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील बरशिले वस्तीवर राहणाºया प्रवीण नामदेव बरशिले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील चार लाख रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी (दि.७ मार्च) संध्याकाळी ही घटना घडली. शनिवारी संध्याकाळी अचानक वाढलेल्या विद्युत प्रवाहाने घरातील वस्तूने पेट घेतला. इतर ठिकाणीही वायर पेटल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य कपडे, धान्य, भांडे व महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक  झाले. नेहमीप्रमाणे कामावरुन आल्यानंतर घराशेजारील गोठ्यात प्रवीण बरशिले साफसफाई करीत होते. यावेळी अचानक वाढलेल्या विद्युत दाब वाढला. यामुळे घरातील फ्रीजने पेट घेतला. यावेळी मोठा आवाज  होऊन फ्रिजचा दरवाजा घराबाहेर उडून पडला. सुदैवाने येथे कोणी नसल्यान जखमी झाले नाही. यानंतर बरशिले यांनी लोकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. प्रथम पाणी टाकले. घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे बरशिले यांनी सांगितले. आगीच्या घटनेचा पंचनामा रविवारी सकाळी जवळे येथील  आगीच्या घटनेचा पंचनामा केला आहे. सदर अहवाल पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे सादर करणार आहे, अशी माहिती जवळे कामगार तलाठी आकाश जोशी यांनी दिली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरfireआग