शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: कोपरगाव दुय्यम कारागृहात अडगळीला आग, ट्रेझरीचे स्टॅम्प पेपर वाचले

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 9, 2023 13:47 IST

Ahmednagar: अहमदनगर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम कारागृहाच्या एका खोलीत ठेवलेल्या अडगळीच्या सामानाला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली.

- सचिन धर्मापुरीकरअहमदनगर - शहरातील तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम कारागृहाच्या एका खोलीत ठेवलेल्या अडगळीच्या सामानाला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. कारागृहाचे बांधकाम करायचे असल्याने येथील कैद्यांना अन्य कारागृहांत हलविण्यात आलेले आहे. त्यामुळे दुर्घटना टळली. तसेच वेळीच दक्षता घेतल्या गेल्याने जवळच असलेल्या ट्रेझरीच्या स्ट्राँग रुमला कुठलाही धोका निर्माण झाला नाही.

कोपरगाव तहसील कार्यालय परिसरात दुय्यम कारागृह आहे. या कारागृहाचे बांधकाम करावयाचे असल्याने येथील कैद्यांना अन्य कारागृहांत हलविण्यात आले आहे. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कारागृहाच्या एका खोलीत जाळ लागल्याचे अनिल वैरागळ, सिद्धार्थ वाघमारे (रा. टीळकनगर, कोपरगाव) यांच्या लक्षात आले. वैरागळ यांनी आत जाऊन पाहिले असते, जूने कपडे, अडगळीचे सामान याला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतू आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर तुरूंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांना माहिती देण्यात आली. ते घटनास्थळी पोहोचले, नगर परिषदेच्या अग्नीशमक बंबालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.

ज्या ठिकाणी आग लागली, तेथून काही फूटांवरच ट्रेझरी ऑफीसचे स्ट्राँग रुम आहे. आगी वाढली असती तर लाखो रूपयांच्या स्टॅम्प पेपरचे नुकसान झाले असते, या शिवाय कारागृहाच्या मागील बाजूस स्वस्त धान्याचे शासकिय गोदाम आहे. वेळीच दक्षता घेतल्याने व आग आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळल्याचे, बोलले जाते. 

टॅग्स :jailतुरुंगfireआगAhmednagarअहमदनगर