शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:58 IST

कोरोना साथीचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.

मुंबई/शिर्डी : कोरोना साथीचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. विशेष म्हणजे या परिक्रमेत विविध संत-महंतांसह शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही सहभाग घेतला होता.ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन शिर्डी फाउंडेशन या परिक्रमेचे आयोजन केले होते़ त्या संदर्भात समितीसह जितेंद्र शेळके व अजित संपतलाल पारख या आयोजकांवर गुन्हे नोंदविले गेले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी परिक्रमा स्थगित करण्याचा आदेश आयोजकांना दिला होता. मात्र रविवारी सकाळी साडेसहा वाजता खंडोबा मंदिरातून परिक्रमा सुरू झाली़ त्यात महंत रामगिरी महाराज, महंत काशिकानंद महाराज, नगराध्यक्षा अर्चना कोते, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह हजारो भाविक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोरोनाच्या संदर्भात आदेश मोडल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १५३ व भादंवी कलम १८८ अन्वये हे गुन्हे नोंदविण्यात आले. वाई येथे १३ मार्च रोजी बावधन यात्रेचे आयोजन केले गेले. त्यात पाच हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले. असे गर्दीचे धार्मिक कार्य्रक्रम आयोजित न करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून पाच जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याचे साताºयाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले.मॉर्निंग वॉकला गेलो होतोशिर्डीत असताना मॉर्निंग वॉकला जात असतो. रविवारी मॉर्निंग वॉक करताना रस्त्यात परिक्रमावासीय भेटले. त्यांच्याशी चालताना संवाद साधला़ आपण परिक्रमेचा प्रारंभ किंवा सांगतेला उपस्थित नव्हतो, असा दावा खा. लोखंडे यांनी केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी