अविनाश शेलार यांचे भाऊ सचिन शेलार व चुलत भाऊ संजय कारभारी शेलार यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये सहा महिन्यांत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. शेलार यांनी आपल्या दोन्ही भावांना शिपाई व क्लार्क म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने कडू यांनी क्लार्कसाठी आठ लाख व शिपाई पदासाठी सहा लाख देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेलार यांनी सुरुवातीला निम्मी व काम पूर्ण झाल्यावर निम्मी रक्कम देण्याचे असे ठरवले. २०१७ पासून चेक व रोख स्वरूपात कडू यांना सात लाख रुपये दिले. कडू यांच्याकडे नियुक्तीपत्र व नोकरीची वारंवार विचारणा केली. सुरुवातीला काम होईल असे सांगितले. नंतर टाळाटाळ केली. फोन उचलणे बंद केले. आपली फसवणूक होत असल्याचे शेलार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.
रयतमध्ये नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:51 IST