शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गांधी-नेहरू परिवाराच्या बदनामीप्रकरणी लोणीत युट्यूब चॅनेलविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 17:59 IST

गांधी-नेहरू परिवारासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबाबत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका यु ट्यूब चॅनेलविरूद्ध विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंची फिर्याद

लोणी(अहमदनगर) : गांधी-नेहरू परिवारासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबाबत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका यु ट्यूब चॅनेलविरूद्ध विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.खोटे व्हिडीओ अपलोड करून दिवंगत मोतीलाल नेहरूंपासून ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबाबत या चॅनेलवरून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. या चॅनेलने अपलोड केलेल्या एका व्हिडीओत काँग्रेस पक्ष व पक्षातील प्रमुख नेत्यांबाबत धादांत खोटी,निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारीत करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. अत्यंत हिन दर्जाची भाषा वापरून गांधी-नेहरू परिवाराची बदनामी केली जात आहे. त्यामुळे माझ्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकारातून देशासाठी अपूर्व योगदान देणाऱ्या थोर नेत्यांची प्रतिमा मलिन करून एकप्रकारे भारताचाही अवमान केला आहे. त्यामुळे हा एकप्रकारे देशद्रोहच ठरतो. त्यामुळे या चॅनेलविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे विखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद देताना विखे यांच्यासोबत माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, काँग्रेसचे राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, भगवंतराव विखे, किसनराव विखे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अनिल विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, संजय आहेर, नंदलाल राठी, सुभाष विखे, लक्ष्मण विखे, गणेश विखे, बंडू लगड, शिर्डी नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते.

या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात भादंवि १५३ अ, २९५ अ नुसार सामाजिक तेढ निर्माण करणे, धर्म, वंश, जन्मस्थान, निवास आदी कारणांवरून शत्रुत्व वाढविणे, कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याच्या कारणावरून या चॅनेलविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.-रणजीत गलांडे, पोलीस निरीक्षक, लोणी पोलीस ठाणे.या चॅनेलने सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे हे य ुटयुब चॅनेल व त्यांचे फेसबुक पेज तातडीने हटविण्यात यावे. पोलीस प्रशासन व सरकारने याबाबत गांभीर्य न दाखविल्यास काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील.-राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस