शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या पाण्यासाठी लढा सुरूच राहणार

By admin | Updated: September 23, 2014 23:02 IST

बाभळेश्वर : हक्काच्या पाण्यासाठी लढाई सुरूच ठेवावी लागेल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

बाभळेश्वर : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची केलेली शिफारस ही शेतकरी, उद्योग, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या हितविरोधी असून, या निर्णयाचा नगर जिल्हातील शेतीसह उद्योगक्षेत्रावरही मोठा परिणाम होईल. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी लढाई सुरूच ठेवावी लागेल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी समन्यायी पाणी वाटप धोरणामुळे धरणातून पाणी सोडण्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळेस या निर्णयाच्या विरोधात नगर जिल्हातून सर्वात प्रथम आपण विरोध केला. तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व राहाता नगरपालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून या निर्णयाला शेतकरी, उद्योग, व्यापारी व सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण विरोध केला. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणापुढे वेळोवेळी भूमिका स्पष्ट करून, ही लढाई सुरू ठेवली असतानाच, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने आता पुन्हा जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची केलेली शिफारस ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांबरोबरच सर्वच क्षेत्रांना उद्ध्वस्त करणारी आहे.भंडारदरा, निळवंडे धरणे भरल्याने ओव्हफ्लोचे पाणी जायकवाडीकडे जात आहे. शेजारील मुळा धरणातही सध्या २५ हजार टीएमसी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याकडे लक्ष वेधून विखे म्हणाले, मुळातच मेंढेगिरी समितीला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. मागील दोन वर्षे दुष्काळाच्या संकटात सापटलेल्या नगर जिल्ह्याला यंदा कुठेतरी उशीरा झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असतानाच, पाणी सोडण्याच्या या निर्णयामुळे हक्काच्या पाण्यावर गदा येणार आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन प्राधान्याने हक्काच्या पाण्यासाठी कायदेशीर लढाई सुरूच ठेवावी लागेल, असे विखे यांनी सांगितले. (वार्ताहर)