शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उन्नावमध्ये अडकले नवोदयचे पंधरा विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:16 IST

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील नववीचे १५ विद्यार्थी उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये अडकले आहेत. तसेच उन्नावमधील १५ विद्यार्थीही टाकळी ढोकेश्वरमध्ये अडकले आहेत.

विनोद गोळे । पारनेर : उत्तरप्रदेश सरकारने दोन वेळा परवानगी देऊनही नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व नगर जिल्हा प्रशासनातील समन्वयाअभावी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील नववीचे १५ विद्यार्थी उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये अडकले आहेत. तसेच उन्नावमधील १५ विद्यार्थीही टाकळी ढोकेश्वरमध्ये अडकले आहेत.टाकळी ढोकेश्वर येथे केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय आहे. नववीचे विद्यार्थी मागील वर्षी एक वर्षाच्या अंतर्गत आदान-प्रदान अभ्यास कार्यक्रमासाठी उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथे व तेथील विद्यार्थी टाकळी ढोकेश्वरमध्ये आहेत. एप्रिलमध्ये ते परत येणार होते. मात्र देशभर कोरोनामुळे संचारबंदी असल्याने ते अडकून पडले आहेत. पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील पालकांनी याची माहिती आमदार निलेश लंके यांना दिली. नंतर लंके यांनी माहिती घेतल्यावर जिल्हा प्रशासन आणि प्राचार्य यांच्यातील असमन्वयाचा प्रकार समोर आला आहे. उन्नावमधील टाकळी ढोकेश्वर येथील विद्यार्थ्यांची तपासणी करून सोडण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने दोनदा परवानगी दिली. मात्र टाकळी ढोकेश्वर येथे उत्तरप्रदेशच्या अडकलेले १५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांकडे याचा प्रस्तावच गेला नाही. त्यामुळे दोन्हीकडचे विद्यार्थी अडकून पडले आहेत.जवाहर नवोदय विद्यालयात उन्नावच्या अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे डॉक्टर सेल प्रमुख डॉ. बाळासाहेब कावरे यांना सूचना केल्या. त्यानंतर डॉ. कावरे यांनी शासकीय वैद्यकीय अधिकाºयामार्फत विद्यार्थ्यांची तपासणी करून अहवाल प्राचार्यांना दिला आहे. 

आमदार निलेश लंके यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याबरोबर चर्चा करून टाकळी ढोकेश्वरमधील उन्नावच्या विद्यार्थ्यांना उत्तरप्रदेशमध्ये जाणण्यासाठी परवानगी मिळवून दिली. तसेच त्यांना घेऊन जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून दिली आहे, असे पारनेर तालुका राष्टÑवादी सेलचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे यांनी सांगितले.      

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीSchoolशाळा