शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक पद्धतीमुळे ‘कोरोना’च्या प्रसाराची भीती; ठसे, बायोमेट्रिक हजेरी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 16:05 IST

साईभक्तांना आजवर त्रासदायक ठरलेली बायोमेट्रिक दर्शन पद्धत भाविकांसाठी आता जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच थम मशिनवर अनेक भाविक आपल्या हाताचे ठसे देत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढत आहे़.

प्रमोद आहेर । शिर्डी : साईभक्तांना आजवर त्रासदायक ठरलेली बायोमेट्रिक दर्शन पद्धत भाविकांसाठी आता जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच थम मशिनवर अनेक भाविक आपल्या हाताचे ठसे देत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढत आहे़.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात वारंवार स्वच्छ करणे, हस्तांदोलन टाळणे आदी सूचना देण्यात येत आहेत. संस्थानमध्ये सामान्य भाविकांना बायोमेट्रिक दर्शनाचा पास काढावा लागतो. यासाठी आठ-दहा मशीन बसवण्यात आले आहेत. इथे प्रत्येक भाविकाचा फोटो काढण्यात येतो व हाताचा ठसा घेण्यात येतो. रांगेत असलेले भाविक एका पाठोपाठ एक त्या मशिनवर थमसाठी आपली बोटे टेकवतात. यात एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीने थम मशिनवर ठसे दिल्यानंतर त्या पाठोपाठ थम देणा-या भाविकालाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिर्डीत रोज सरासरी पन्नास हजार तर गर्दीत लाखावर लोक दर्शनासाठी येतात.एकीकडे संस्थान आयसोलेशन वार्ड तयार करत आहे. आजाराविषयी प्रबोधनाचे फलक लावत आहे. कर्मचारी-अधिका-यांचे प्रशिक्षण घेत आहेत. पण जेथून संसर्गाची शक्यता आहे, अशा गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. जेथे भाविक एकाच जागेवर वारंवार हात लावतात, अशा ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़. या अगोदरच ही बायोमेट्रिक पद्धत भाविकांसाठी त्रासदायक व अनावश्यक ठरत आहे. आता ती जीवघेणीही ठरण्याची शक्यता झाल्याने संस्थानने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायतसह शहरातील अनेक हॉटेल, संस्था, आस्थापना व काही शाळेतही बायोमेट्रिक हजेरी सुरू आहे़. तुर्तास या ठिकाणीही पुन्हा मस्टरवर हजेरी घेण्याची आवश्यकता आहे़.

आम्ही स्वच्छता वाढवलीय. प्रबोधन करत आहोत.  बायोमेट्रिक सिस्टीम जवळ भाविकांना हात स्वच्छ करण्यासाठी सॅनीटायझर उपलब्ध करून देऊ. आणखी काय काय करता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत़, असे साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.   

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाcorona virusकोरोना वायरस बातम्या