शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

Corona virus : बापरे! आता कोपरगावात आढळला कोरोनाचा रूग्ण : जिल्ह्याचा आकडा २७ वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:15 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच फैलावत असून आता कोपरगाव येथील ६० वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने समोर आले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच फैलावत असून आता कोपरगाव येथील ६० वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने समोर आले आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ती व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आजच एका कोरोनाबाधिताला डिस्चार्ज दिला. त्यानंतर तासाभरानेच पुन्हा एका रूग्णाची भर पडली. त्यामुळे नगरमधील रूग्णांची संख्या आता २७ झाली आहे.

तिस-या कोरोनाबाधित रूग्णाला अखेर डिस्चार्ज 

नगरमध्ये पहिले तीनही कोरोनाबाधित रूग्ण आता बरे झाले आहेत. शुक्रवारी  सायंकाळी तिसºया रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी १२२ पैकी १०३ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. नगरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २७ वर गेली आहे. त्यातील एकजण बीड जिल्ह्यातील आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील असलेल्या एका मतिमंद रूग्णाचे पुण्यातील ससूण रूग्णालयात उपचार घेताना शुक्रवारी निधन झाले. पहिल्या दोन रूग्णांना आधीच डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामुळे बूथ हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात सध्या २२ रूग्ण आहेत.  दरम्यान तिस-या कोरोनाबाधित रूग्णाचे १४ व १५व्या दिवशीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून शुक्रवारी सायंकाळी बूथ हॉस्पिटलमधून या रूग्णाला घरी सोडण्यात आले. त्या रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाºयांनी या रूग्णाला टाळ्या वाजवून निरोप दिला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय