शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खत टाकायला गेलेल्या बाप-लेकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; गावकऱ्यांचा महावितरणवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:56 IST

जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे विद्युत तारेला चिकटून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Jamkhed Accident: अहिल्यानगरमध्ये उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेतातील विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील ग्रामपंचायतीचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे (४२) व त्यांचा मुलगा गणेश शिकारे (१५) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. महावितरणच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

बाळगव्हाण येथे शिकारे वस्ती येथे राहणारे काकासाहेब व त्यांचा मुलगा गणेश हे दोघे सोमवारी शेतात गेले होते. ते घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय व काही ग्रामस्थांनी शेतात जाऊन त्यांचा शोध घेतला. तेव्हा दोघांचाही मृतदेह शेतात विजेच्या तुटलेल्या तारेजवळ आढळून आला. गावात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील विजेच्या तारा तुटल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी वीज तारा तुटल्या असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने दोघांचा बळी गेला असल्याचे बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच खर्डा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

दोषींवर कठोर कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी

या घटनेनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेसाठी महावितरण जबाबवदार असल्याचे म्हटलं. "शेतात खत टाकण्यासाठी गेले असताना विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून खर्डा (ता. जामखेड) परिसरातील शिकारे वस्ती बाळगव्हाण येथील ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब शिकारे (४२) आणि त्यांचा मुलगा महेश (१५) या पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद घटना आहे. या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तुटलेल्या या तारा अद्यापही तशाच पडून आहेत आणि त्यामुळंच या बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला. याला पूर्णतः महावितरण जबाबदार आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कधीही भरून न निघणारी हानी लक्षात घेता शिकारे कुटुंबालाही मदत करावी, ही विनंती!," असं रोहित पवार यांनी म्हटलं. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरAccidentअपघात