शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:21 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे.

लोणी : प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे. इतरांसारखे शेतक-यांना केवळ मोर्चे काढायला आम्ही लावले नाहीत, शेतक-यांची सुरक्षितता देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.वाजपेयी सरकारने हाती घेतलेले धोरण पुन्हा एकदा केंद्र सरकारने पुढे नेण्यास प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रकात पाटील यांनी केले.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या 87 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात पाटील बोलत होते. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, नाबार्डचे माजी चेअरमन डॉ. यशवंत थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, सभापती दिपकराव पठारे, सुभाषराव पाटील, राजेश परजणे, अशोकराव भांगरे उपस्थित होते. कारखाना कार्यस्?थळावरील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पाजंली अर्पन करुन अभिवादन केले.पाटील म्हणाले, केवळ कर्जमाफी देवून शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर, शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल. यासाठीच जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला. राज्य सरकारचे हे धोरण म्हणजे डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या विचारांशी सुसंगत असे आहे. केंद्र सरकारने आता केवळ पाण्यासाठी 24 हजार कोटी रुपयांची उपलब्धता करुन दिली असून, या माध्यमातून बंद पडलेले जलसिंचन प्रकल्प सुरु करण्यास प्राधान्य दिले गेले आहे. मधल्या काळात देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्यांकडून शेतक-यांचा विचार झालाच नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेchandrakant patilचंद्रकांत पाटीलRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील