शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अगस्ती कारखान्याच्या गव्हाणीत शनिवारी शेतकरी घेणार उड्या; ऊस दराचा प्रश्न चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 10:57 IST

अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड व ऊस दर आंदोलनाचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कारखाना कार्यस्थळावर दराबाबत बैठक झाली. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने शनिवारी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्यावर आंदोेलक ठाम आहेत.

ठळक मुद्देउसाला पहिली उचल प्रतिटन २५५० रुपये मिळण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि.१६) ‘अगस्ती’च्या गव्हाणीत उड्या टाकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिला आहे.पिचड यांनी सावंतांसह आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले होते. चर्चेदरम्यान आर्थिक कारणे सांगत उसाला २३०० रुपयांपेक्षा अधिक भाव देता देणार नाही, असे पिचड व संचालक मंडळाने स्पष्ट केले.चर्चा फिस्कटल्याने शनिवारी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्यावर आंदोेलक ठाम आहेत.

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड व ऊस दर आंदोलनाचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कारखाना कार्यस्थळावर दराबाबत बैठक झाली. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने शनिवारी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्यावर आंदोेलक ठाम आहेत.उसाला पहिली उचल प्रतिटन २५५० रुपये मिळण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि.१६) ‘अगस्ती’च्या गव्हाणीत उड्या टाकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिला आहे. पिचड यांनी सावंतांसह आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले होते. चर्चेदरम्यान आर्थिक कारणे सांगत उसाला २३०० रुपयांपेक्षा अधिक भाव देता देणार नाही, असे पिचड व संचालक मंडळाने स्पष्ट केले.‘सबबी सांगू नका. कोल्हापूर भागातील साखर कारखान्यांना भाव देता येतो, मग अगस्तीला भाव का देता येत नाही? साखर कारखाना बंद न पाडता आंदोलन कसे करायचे?, हे आम्हाला माहीत आहे. २५५० रुपये पहिली उचल ऊस उत्पादकांना द्या’अशी भूमिका सावंत यांनी मांडली. कारखाना त्यास तयार न झाल्याने शनिवारी गव्हाणीत उड्या घेण्याच्या आंदोलनावर शेतकरी ठाम असून शेतकरी हिताची चाड असेल तर अगस्तीच्या संचालकांनी ऊस भावाच्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनास सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलकांनी यावेळी केले.अध्यक्ष पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळासमवेत झालेल्या चर्चेत आंदोलनाचे नेते सावंत यांच्यासह बबन नवले, पाटीलबुवा सावंत, चंद्रकांत नेहे, नामदेव आरोटे, पांडुरंग नवले, मनोहर मालुंजकर, प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब मालुंजकर, अरुण आरोटे या शेतकºयांनी भाग घेतला. दरम्यान मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस तालुक्यातील प्रवरा-आढळा-मुळा खोºयातील गावांमधे शेतकरी जागृती सभा झाल्या. अकोलेनंतर संगमनेर व लोणीतही आंदोलने पेटणार आहेत.

कारखाना बंद पाडून त्याचे खापर आमच्या माथी मारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र कारखाना बंद पडू न देता आंदोलन कसे करायच हे आम्हाला माहीत आहे. कारखान्याचे काही संचालक राजीनामे देऊन आंदोलनात सहभागी होण्याच्या मानसिकतेचे आहेत. या संचालकांनी अगस्ती सुरू करण्यासाठी आपल्या डोक्यावर वैयक्तिक कर्ज घेतल्याने अडचण झाली आहे. मात्र वेळ पडल्यास ते आंदोलनात उतरतील, असा विश्वास आहे. २५५० रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय आता आंदोलन थांबणार नाही.-दशरथ सावंत, माजी प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेSugar factoryसाखर कारखाने