शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यामुळे वाचले हजारो रेल्वे प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 06:02 IST

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय हुतात्मा एक्स्प्रेसमधील हजारो प्रवाशांना रविवारी सकाळी अहमदनगर तालुक्यातील देहरे शिवारात आला.

- योगेश गुंड अहमदनगर : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय हुतात्मा एक्स्प्रेसमधील हजारो प्रवाशांना रविवारी सकाळी अहमदनगर तालुक्यातील देहरे शिवारात आला. रेल्वे रूळ तुटलेले पाहताच शेतक-याने प्रसंगावधान राखत लाल कापड दाखवून भरधाव जाणा-या रेल्वेला थांबण्यास भाग पाडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.रविवारी सकाळी नऊ वाजता भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस देहरे- विळद परिसरातून जात होती. त्याच वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणारे शेतकरी रामदास बापूराव थोरात यांना विळद-वांबोरीच्या दरम्यान रेल्वेचा रूळ तुटल्याचे निदर्शनास आले. समोरच्या दिशेने रेल्वे येत असल्याचे त्यांनी पाहिले. क्षणाचाही विलंब न करता थोरात यांनी अंगातील लाल रंगाचे बनियन काढले व ते गाडीच्या दिशेने हातात फडकवत धोक्याचा इशारा दिला.त्यानंतर, गाडी थांबल्यावर थोरात यांनी रेल्वेचा रूळ पुढे तुटल्याचे सांगितले. चालकाने व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी खातरजमा केली. त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांना माहिती कळविली. रेल्वे कर्मचाºयांनी काही वेळात येऊन रेल्वे रूळ तात्पुरता दुरुस्त केला. त्यानंतर गाडी मार्गस्थ झाली.रेल्वेमार्गात केला होता बदलभुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसचा नियमित मार्ग भुसावळ-मनमाड-नाशिक-कल्याण-पनवेल-लोणावळा-पुणे असा आहे. मात्र, रविवारी काही तांत्रिक कारणास्तव रेल्वेच्या मार्गात भुसावळ-मनमाड-कोपरगाव-अहमदनगर-दौंड-पुणे असा बदल करण्यात आला होता.>काळजाचा ठोका चुकलातुटलेल्या रुळापासून गाडी आधीच थांबावी, यासाठी थोरात गाडीच्या दिशेने धावत होते. काळजाचा ठोका चुकावा, असा तो क्षण होता. त्यांना दमही लागला होता. लाल कापड हातात धरून कोणीतरी फडकवित असल्याचे रेल्वेच्या चालकाच्या लक्षात आहे. चालकाला धोक्याची सूचना लक्षात येताच त्याने त्वरित ब्रेक लावून गाडी थांबविली.