शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडे सरकारचे कुठेही दुर्लक्ष झालेले नाही - राधाकृष्ण विखे पाटील

By शेखर पानसरे | Updated: April 11, 2023 18:59 IST

प्रभू श्रीरामचंद्रांकडे अवकाळीचे संकट टळो, अशीच प्रार्थना केली, या संकटात सरकार तुमच्या सोबत आहे. राज्य सरकारने आजपर्यंत झालेल्या सर्वच नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली

संगमनेर : अयोध्येत गेलो तरी प्रभू श्रीरामचंद्रांकडे अवकाळीचे संकट टळो, अशीच प्रार्थना केली. शेतकऱ्यांकडे सरकारचे कुठेही दुर्लक्ष झालेले नाही. आता जे टीका करतात त्यांच्यात राम राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेला महत्व देण्याचे कारण नाही. असे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी (दि. ११) महसूलमंत्री विखे यांनी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना भेट दिली, तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना युती सरकारने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत आहे. राज्य सरकारने आजपर्यंत झालेल्या सर्वच नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यासाठी नियम आणि निकष सुध्दा बदलले. शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्यासाठी असलेली मर्यादा सुध्दा वाढवली आहे. आता मदतीसाठी सततचा पाऊस सुध्दा ग्राह्य धरण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा अनुदानाच्या बाबतीत नव्याने काही सूचना  दिल्या आहेत. असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील