शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जीवनसाथी वेबसाईटच्या माध्यमातून शेतकरी तरुणाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:31 IST

जीवनसाथी वेबसाईटच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून जामखेड तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी तरुणाला तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांना गंडा घातला.

अहमदनगर : जीवनसाथी वेबसाईटच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून जामखेड तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी तरुणाला तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांना गंडा घातला. याबाबत सदर तरुणाने शुक्रवार(दि़ १३) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़. सारोळा येथील ३३ वर्षीय तरुणाने स्वत:च्या लग्नासाठी ६ सप्टेंबर २०१८ रोजी जीवनसाथी या वेबसाईटवर नावनोंदणी केली होती. या साईटवर तो लग्नाळू तरुणींचे प्रोफाईल तपासत असताना त्याला अश्विनी (नाव बदलेले आहे) हिची पोफाईल दिसली. तरुणाने तिच्याशी संपर्क केला तेव्हा तिने याचा बायोटाडा मागावून घेतला. त्यानंतर दोघे व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू लागले. अश्विनी हिने ती मुंबई येथे राहत असून जाहिराती व शॉटफिल्म तयार करण्याचा व्यवसाय करते अशी ओळख सांगितली होती. ११ डिसेंबर २०१२ रोजी आश्विनी हिने तरुणाला मेसेज केला की, ‘मी दुबई येथे असून माझ्याकडील सर्व पैसे संपले आहेत. मला आता खर्चासाठी २ हजार रुपये पाठव’ या मेसेजनंतर तरुणाने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविले. त्यानंतर विविध कारण, अडचणी सांगून आश्विनी हिने या तरुणाकडून तब्बल १ लाख ६५ हजार रुपये घेतले. तरुणाने तिला भेटण्याची वारंवार विनंती केली. मात्र वेगवेगळे कारणे सांगून तिने भेटण्याचे टाळले़ त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या तरुणाच्या लक्षात आले. सदर तरुणीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतिक कोळी, योगेश गोसावी, राहुल गुंडू, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, हुसळे आदी टीम तपास करत आहे. तिचा तो पत्ता खोटाच़़आश्विनी हिने या तरुणाला तिचा वाशी येथील पत्ता सांगितला होता. विनंती करूनही ती भेटत नसल्याने तरुण थेट वाशी येथे जाऊन आला. तेथे गेल्यानंतर मात्र तिने दिलेला पत्ताच खोटा असल्याचे समोर आले़.‘ती’ एकदाही फोनवर बोलली नाही सारोळ्याचा तरुण एक वर्षे तिच्यासोबत केवळ व्हॉटसअ‍ॅप चॉटिंगच्या माध्यमातून संवाद साधत होता़. आश्विनी एकदाही त्याच्यासोबत फोनवर अथवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलली नाही. लग्नासाठी आतूर झालेल्या तरुणाने मात्र ती मागेल तेव्हा तिच्या बँक खात्यावर पैसे टाकत राहिला़. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी