शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याचे प्रसंगावधान; रेल्वे अपघात टळला, हजारो प्रवाशांचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:54 IST

हुतात्मा एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास नगर तालुक्यातील देहरे शिवारात आला. वेगात चाललेल्या रेल्वेतील प्रवाशांचे प्राण एका शेतक-याच्या सतर्कतेमुळे वाचले.

योगेश गुंड /केडगाव : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय हुतात्मा एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास नगर तालुक्यातील देहरे शिवारात आला. वेगात चाललेल्या रेल्वेतील प्रवाशांचे प्राण एका शेतक-याच्या सतर्कतेमुळे वाचले. रेल्वेचा मार्ग तुटल्याचे त्याने पाहताच प्रसंगावधान राखत रेल्वे थांबवण्यास भाग पाडले. तुटलेला रेल्वे मार्ग पाहून रेल्वेतील कर्मचाºयांना धक्काच बसला. शेतक-यामुळे मोठी दुघर्टना टळली.रामदास बापूराव थोरात (वय ४५, रा. विळद, ता. नगर) असे त्या शेतक-याचे नाव आहे. मनमाडहून नगरच्या दिशेने जाणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस आज सकाळच्या वेळी राहुरी तालुक्यातील वांबोरीहून नगरच्या दिशेने जात होती. ही गाडी नगर तालुक्यातील देहरे, विळद परिसरात आली होती. त्यावेळी येथून रेल्वे लाईनक्रॉस करून आपल्या शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी रामदास बापूराव थोरात हे जात असताना विळद-वांबोरीच्या दरम्यान रेल्वेचा मार्ग (रूळ) तुटल्याचे शेतक-याच्या निदर्शनास आले. त्याच वेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी येत असल्याचे त्यांनी पाहिले. आता पुढे काय होणार याची कल्पना या शेतक-याला क्षणात आली. त्याच वेळी क्षणाचा विलंब न करता थोरात यांनी लगेच हालचाल सुरू केली. आपल्या जिवाची परवा न करता त्यांनी अंगातील लाल रंगाचे बनियन काढून हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे रूळातून गाडीच्या दिशेने हातात लाल बनियन फडकवत धाव घेतली. वाढते वय व शरीर यांची तमा न बाळगता ते वेगाने धावत सुटले. काळजाचा ठोका चुकावा असा तो क्षण होता. पळून त्यांना खूप दम लागला होता तरीही ते न थांबता रेल्वे रूळातून पळत राहिले. लाल कापड फडकवत असलेला व गाडीच्या दिशेने तो व्यक्ती पळत येत असल्याचे रेल्वे चालकाने पाहिले. या व्यक्तीला काहीतरी धोक्याची सूचना द्यायची असल्याचे लक्षात येताच चालकाने त्वरीत ब्रेक लाऊन गाडी थांबवली. शेतक-याने रेल्वेचा रूळ पुढे तुटल्याचे सांगितले. चालकाने व इतर रेल्वे कर्मचा-यांनी खातजमा केली. झालेली घटना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना कळविली. रेल्वे कर्मचाºयांनी काही वेळात येऊन तात्पुरता रेल्वे रूळ दुरूस्त करून गाडी पुढे जाऊ देण्यात आली

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrailwayरेल्वे