शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून खोटेपणाचा कळस, मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:49 IST

९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : ९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर ताशेरे ओढले़स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचा निर्धारही अण्णांनी सोमवारी व्यक्त केला़ उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. सरकारने किती खोटं बोलावं याला काही सीमा आहे़ सरकारचे मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत येऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. अजून पाच दिवस तरी आपणाला काही होणार नाही. वजन कमी होतंय़ थोडाफार त्रास होत आहे. पण मी उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.जेटली, स्वराज गप्प का?१७ व १८ डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल कायदा बिल लोकसभेत मांडले़ त्यावेळी भाजपचे सध्याचे मंत्री सुषमा स्वराज व अरुण जेटली लोकपाल कायद्याबाबत जे बोलत होते. ते आता सत्तेवर आल्यावर बोलायला तयार नाहीत. चूप झालेत सर्व. लोकपाल शब्दाचीच त्यांना अ‍ॅलर्जी झालीय. ज्या लोकपाल आंदोलनामुळे केंद्रात व राज्यात सत्ता मिळाली. पण आता कोट्यवधी जनतेशी ते गद्दारी करीत आहेत़

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे