शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये बनावट ताडी, हातभट्टी विक्री तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 19:00 IST

नगर शहरासह उपनगरात आणि परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलपासून तयार केलेल्या बनावट दारू व ताडीची विक्री केली जात आहे. तोफखाना, कोठला, कल्याण रोड, एमआयडीसी, चितळे रोड, औरंगाबाद रोड, सोलापूर रोड परिसरात असलेल्या अड्यांमध्ये ही दारू तयार करतात.

अहमदनगर : नगर शहरासह उपनगरात आणि परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलपासून तयार केलेल्या बनावट दारू व ताडीची विक्री केली जात आहे. तोफखाना, कोठला, कल्याण रोड, एमआयडीसी, चितळे रोड, औरंगाबाद रोड, सोलापूर रोड परिसरात असलेल्या अड्यांमध्ये ही दारू तयार करून सर्वत्र वितरित करतात. या अवैध दारू विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.वर्षभरापूर्वी जिल्हा रूग्णालयातील कॅन्टीमध्ये तयार झालेली बनावट दारू पिऊन पांगरमल येथील दहा जणांचा बळी गेला आहे़ या घटनेतूनही उत्पादन शुल्क विभागाने काहीच धडा घेतलेला दिसत नाही़ अवैध दारू निर्मिती आणि विक्री रोखण्याची मोठी जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे. या विभागातील निरिक्षकांनी मात्र ‘झिरो’ची नेमणूक करून कारवाई ऐवजी ‘उत्पादन’ची कामगिरी सुरू केली आहे. अवैध दारू विक्रीतून शहरात व परिसरात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी नेमणूक असलेल्या हद्दीत महिन्यातूनच एकदाच ‘उत्पादन’साठी फेरी मारताना दिसत आहेत.

ताडीवरील कारवाई का थंडावली

जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी स्वत: २७ डिसेंबर रोजी शहरातील कोठला व तोफखाना परिसरात बनावट ताडीच्याअड्यांवर कारवाई केली होती. या ताडीनिर्मिती संदर्भात उत्पादन शुल्क विभागाने पुढे कडक कारवाई करणे अपेक्षित होते़ प्रत्यक्षात मात्र ज्या ठिकाणी कारवाई झाली त्याच परिसरात सध्या ताडी निर्मिती जोरात सुरू आहे़ एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी शहरातील ताडीच्या अड्यांना संरक्षण देण्याचा ठेका घेतला आहे. आता या ठेकेदारावर कोण कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानसभेत ‘तारांकित’

राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू व ताडी विक्री केद्रांवर केलेल्या कारवाईबाबत आमदार विजय औटी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. दारू, ताडीबाबत केलेली कारवाई खरी आहे का? दोषींवर काय कारवाई केली? कारवाई केली नसेल तर विलंब का होत आहे, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

शहरासह जिल्ह्यात अवैध दारू विक्री निदर्शनास आली तर तत्काळ कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही दारूविक्रीबाबत काही माहिती दिली तर कारवाई करण्यात येते़ उत्पादन शुल्क विभागाकडून नियमित तपासी मोहिम सुरू आहे.-पराग नवलकर, अधीक्षक,उत्पादन शुल्क

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliquor banदारूबंदी