शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

पदरात पडेल तेव्हा खरं! गावकºयांनी पाहिले पहिल्यांदाच बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 02:00 IST

‘आमच्या कामामुळे आम्ही आजवर कधीच बजेट पाहिले नाही. बजेट आम्हाला कळतय तरी कुठं? यावर्षी पहिल्यांदा ते ऐकलं. निवडणुकांतही अशाच घोषणा आम्ही ऐकतो. पदरात पडेल तेव्हा खरं म्हणायचं,’ अशा शब्दांत गोगलगावकरांनी अर्थसंकल्पाबाबत आपलं आकलन मांडलं.

- साहेबराव नरसाळे/ चंद्रकांत शेळके/ सुहास पठाडेअहमदनगर : ‘आमच्या कामामुळे आम्ही आजवर कधीच बजेट पाहिले नाही. बजेट आम्हाला कळतय तरी कुठं? यावर्षी पहिल्यांदा ते ऐकलं. निवडणुकांतही अशाच घोषणा आम्ही ऐकतो. पदरात पडेल तेव्हा खरं म्हणायचं,’ अशा शब्दांत गोगलगावकरांनी अर्थसंकल्पाबाबत आपलं आकलन मांडलं.मकरंद अनासपुरे यांनी केलेल्या ‘स्वच्छमेव जयते’ या चित्रपटामुळे गोगलगाव राज्यात चर्चेत आले आहे. ‘सापडना राव गुगलगाव’ असे या चित्रपटाचे पूर्वीचे नाव होते. ‘गुगल’ झेप घेऊ पाहणाºया या गावात ‘लोकमत’ टीमने गावकºयांना एकत्र जमवून बोलते केले. सरपंच योगेश म्हस्के यांनी सर्व गावकºयांना शाळेत दूरचित्रवाणीवर बजेट लाइव्ह दाखविण्याची व्यवस्था केली होती. गावातील वृद्धांसह महिलाही मोठ्या औत्सुक्याने जमल्या होत्या. त्यात अगदी नववारी साडी घातलेल्या साठी ओलांडलेल्या आजीबाईही होत्या. कांदा काढणी, ऊसतोडणी व इतर शेतीची कामे सुरू असतानाही गावकरी टीव्हीसमोर जमले होते.दूरचित्रवाणीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांची एकेक घोषणा सुरू होती. गावकरी त्या घोषणांकडे औत्सुक्याने पाहत होते. शेतमालाच्या हमीभावासाठी गतवर्षी नगर जिल्ह्यातील पुणतांब्याहून शेतकºयांचा संप उभा राहिला. त्यामुळे मोदी सरकार शेतीसाठी काय तरतूद करणार? याची सगळ्या देशालाच उत्सुकता होती. साठीत पोहोचलेले मच्छिंद्र डांगे हे आयुष्यात प्रथमच बजेटचे भाषण ऐकत होते. ते म्हणाले, ‘बजेट म्हणजे काय तेच आपणाला माहीत नव्हते. आज पहिल्यांदा असं काही पाहिलं.’शेतकरी भाऊसाहेब म्हणाले, ‘उत्पादनखर्चाच्या दीडपट भाव देण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण, सध्याच्या हमीभावाची काय अवस्था आहे? दीडपट तर लांबच राहिलं, झालेला खर्च पदरात पडत नाही.उसाला २ हजार ५५० रुपयांचा भाव जाहीर केला, पण प्रत्यक्षात कारखान्यांनी एकवीसशे रुपयेच हातात टेकवले.’अंगणवाडी सेविका विमल वांढेकर याही बजेटमधील घोषणांवर समाधानी दिसत नव्हत्या. ‘अंगणवाडी सेविका सर्व गावाचे काम उपसते़ लोकांचे आरोग्य जपते़ पण तिलाच सुविधा नाहीत. आरोग्य केंद्रात तिला साधी तापाची गोळी मिळत नाही. सरकार गरिबांना आरोग्य विमा, मोफत डायलिसिसची सुविधा देणार आहे. पण, आरोग्य केंद्रात कधी डॉक्टर नसतात, तर कधी औषधे़त्याचे काय?’ असा सवाल त्यांनी केला.पन्नासी ओलांडलेले ज्ञानदेव म्हस्के सांगत होते, ‘हे सगळं दिल्लीत सुरू आहे. घोषणा बक्कळ झाल्या. पण, त्या आमच्या गावात येतील तेव्हा खºया मानायच्या.’ विजय डांगे यांनीही बजेट म्हणजे निव्वळ कागदी घोडे असल्याची प्रतिक्रिया दिली.... बजेटची भानगड असते काय?काही लोकं बजेटवर भरभरून बोलत होती़ तर काही एकदमच गप्प बसलेली़ अशाच गप्प बसलेल्या कमल खंडागळे या आजीबार्इंना गाठलं. यापूर्वी कधी बजेट पाहिलं आहे का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘काम करणं एव्हढंच आम्हाला माहिती आहे़ सरकारच्या योजना असतात हेही माहिती आहे, पण हे बजेट काय असतं?’ त्यावर अनेकांनी हसून त्यांना प्रतिसाद दिला. विजय पवार हा द्विपदवीधर तरुण मागे बसलेला होता़ तो पुढे येत म्हणाला, सरकारने मुद्रा योजनेचा मोठा गवगवा केला. पण बँका आमच्यासारख्या बेरोजगारांंना दारातही उभ्या करत नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये ७० लाख तरुणांना नोकºया देण्याच जाहीर केलंय़बजेटमध्येच वीज गुलसरकारने १.७५ कोटी कुटुंबांना वीज कनेक्शन देण्याची व खेड्यांना वाय-फायची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. गोगलगावमध्ये बजेटचे भाषण सुरू असतानाच वीज गुल झाली. ग्रामीण भागात सिंगल फेजची सुविधा आहे. मात्र, तीही बंद होती. गावकºयांनी महावितरणला संपर्क केल्यावर सिंगल फेज सुरू झाली.सरपंचांनी केले बजेटचे स्वागतगोगलगावचे सरपंच योगेश म्हस्के यांनी विकासदर वाढविण्यासाठी सरकारचा प्रयत्न स्वागतार्ह असल्याचे सांगितले़ शेती उत्पन्न वाढवणे, हमीभाव हे निर्णय शेतकºयांच्या दृष्टीने चांगले आहेत.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र