शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोतुळमध्ये महाकाय गोगलगायींचे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 12:52 IST

जैव स्थलांतराची महाराष्ट्राला अनोखी भेट : दोन चौरस किलोमीटर क्षेत्रात अस्तित्व; दक्षिण आफ्रिका, अमेरिका, केरळ, कर्नाटक ते महाराष्ट्र असा प्रवास

ठळक मुद्देया गोगलगायी दक्षिण आफ्रिका व उत्तर अमेरिकेत आढळतात. या ठिकाणचे तापमाना सामन्यत: २० ते २५ अंश सेल्सिअस इतके असते तर लांबी २५ ते ४० सेंटिमीटरपर्यंत तर वजन १०० ते ३०० ग्रॅमपर्यंत असते.भारतीय शंखाची गोगलगाय सामान्यपणे ५ ते ९ सेंटिमीटर लांबीच्या असतात. तर शंखाची लांबी सरासरी २ ते ९ सेंटिमीटर असते. वजन १० ते पंचवीस ग्रॅमपर्यंत असते.कोतुळमध्ये या महाकाय गोगलगायी शेतात व रस्त्यावर हजारोंच्या संख्येने दिसतात. त्यांचे वजन १०० ते १८० ग्रॅमपर्यंत आहे. तर शंखाची लांबी २० ते ३० सेंटिमीटर पर्यंत आहे.

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : अहमदनगर जिल्ह्यातील कोतूळ परिसरात गेल्या चार वर्षांपासून एका अनोख्या पाहुण्याचे दर्शन घडत आहे. देवघरात ठेवलेल्या शंखाच्या आकाराच्या गोगलगायी समुद्रात दिसण्याऐवजी आता रस्त्यावर शेतात दिसू लागल्या आहेत.गोगलगायींना जैव शास्त्रात जायंट स्नेल या नावाने ओळखले जाते. गेल्या चार वर्षापासून कोतूळ गावालगत साबळेवाडी, बुरकेवाडी, पेट्रोलपंप, या दोन चौरस किलोमीटर क्षेत्रात या हजारोंच्या संख्येने आढळतात. त्यामुळे जगभरातील जैव अभ्यासकांना ही एक पर्वणीच ठरणार आहे. भूचर गोगलगायी या सामान्यपणे दोन गटात मोडतात. एक शंखाची व दुसरी बिगर शंखाची. हे दोन्ही प्रकार भारतात आढळतात. भारतीय शंखाची गोगलगाय सामान्यपणे ५ ते ९ सेंटिमीटर लांबीच्या असतात. तर शंखाची लांबी सरासरी २ ते ९ सेंटिमीटर असते. वजन १० ते पंचवीस ग्रॅमपर्यंत असते. ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने गेल्या चार वर्षांत त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीचा अभ्यास केला आहे.मुळात या गोगलगायी दक्षिण आफ्रिका व उत्तर अमेरिकेत आढळतात. या ठिकाणचे तापमाना सामन्यत: २० ते २५ अंश सेल्सिअस इतके असते तर लांबी २५ ते ४० सेंटिमीटरपर्यंत तर वजन १०० ते ३०० ग्रॅमपर्यंत असते. दक्षिण आफ्रिका व उत्तर अमेरिकेत प्रोटिन्सचा मोठा स्रोत म्हणून त्या मानवी आहारात वापरतात. गेल्या चार वर्षांपासून कोतुळात जुलै ते जानेवारी दरम्यान या महाकाय गोगलगायी शेतात व रस्त्यावर हजारोंच्या संख्येने दिसतात. त्यांचे वजन १०० ते १८० ग्रॅमपर्यंत आहे. तर शंखाची लांबी २० ते ३० सेंटिमीटर पर्यंत आहे. तर रिकाम्या शंखाचे वजन २० ते ३५ ग्रॅम आहे.या गोगलगायी जैव विज्ञानात ‘लिसा चिनीटापूलीक’ या मृदुकाय वगार्तील आहेत. तर ‘अ‍ॅचॅटीनागाय (आफ्रिकन जायंट लॅन्ड स्नेल)’ या शास्त्रीय नावाने ओळखल्या जातात. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे अकोले तालुक्यातील तापमान जुलै ते जानेवारी दरम्यान २० ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत असल्याने त्यांना ते पोषक आहे. त्यामुळे त्यांचे जीवनचक्र निर्विघ्नपणे पार पडते. त्यांची आयुष्य मयार्दा तीन ते पाच वर्षांची आहे. त्या सरासरी १५० ते २२० पर्यंत अंडी घालतात. अंड्याचा रंग पिवळसर पांढरा असतो. १२ ते २० दिवसांनी त्यातून पिल्ले जन्माला येतात तर नव्वद टक्के अंड्यातून पिल्लेजन्माला येतात.

कोबी, घास, केळीची साल गोगलगायींचे अन्न

महाकाय गोगलगाय अन्न म्हणून कोबी, घास, केळीच्या साली व तत्सम मांसल वनस्पती खातात. एक गोगलगाय एका रात्रीत पन्नास ग्रॅमपर्यंत कोबीची पाने खाते. या निशाचर असून सुर्यास्ता नंतर व सकाळी आठपर्यंत या मुक्तविहार करतात. दिवसभर त्या झाडांच्या साली, दगडांच्या फटी, जमिनीच्या भेगा, शेती कचऱ्याच्या ढिगाºयाखाली राहतात. प्रजनन काळात अंडीही तेथेच टाकतात. पिल्ले आक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जन्माला येतात. या गोगलगायींची शिकार भारद्वाज पक्षी करतात. या गोगलगायी १८४७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्याची नोंद झाली आहे. तर १८५७ मध्ये कोलकत्ता १८५० मध्ये केरळात आढळून आल्याची नोंद आहे. मात्र गोयलगायी शेतकºयांची डोकेदुखी ठरत आहेत.

अकोले तालुक्यातील कोतुळातील मोठ्या शंखाच्या या गोगलगाय महाकाय गोगलगायीच आहेत. जैव व कीटकशास्त्राच्या अभ्यासकांना ही चांगली मेजवानी आहे. संशोधकांना यावर चांगले संशोधन करता येईल. अभ्यासकांनी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत याठिकाणी संशोधन करणे गरजेचे आहे.-प्रा.लक्ष्मण घायवट, प्राणी शास्त्र विभाग, बीएसटी वरिष्ठ महाविद्यालय, संगमनेर.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले